नागपूर : कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची अद्याप महायुतीकडून घोषणा झालेली नाही. त्यामुळं विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टच सांगितलं आहे.
नागपूर इथं भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले, "श्रीकांत शिंदे यांना भाजपकडून विरोध नाही. ते कल्याणमधून शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीनं आणि मागच्यावेळपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना आम्ही सर्वजण आमची बृहद युती निवडून आणेल"
त्यामुळं आता कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असतील याची आता घोषणा झाली आहे. त्यामुळं या मतदारसंघात आता शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे यांच्यात सामना पहायला मिळणार आहे.
दरम्यान, शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील यावरुन आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "जर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली नाहीतर मी राजकारण सोडेन" त्यानंतर आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |