04:25pm | Mar 15, 2024 |
हल्ली पेनकिलर घेण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. डोकेदुखीपासून ते मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखीपर्यंत कोणत्याही त्रासासाठी अनेकजण सर्रासपणे पेनकिलर घेऊन मोकळे होतात.
पण असं डॉक्टरांना न विचारता मनानेच पेनकिलर घेणं आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. तुमच्या वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर घेण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करून आपल्या स्वयंपाकघरात आपण जे पदार्थ अगदी रोज वापरतो, तेच पदार्थ आयुर्वेदानुसार पेन किलर म्हणूनही काम करतात
कोणता त्रास कमी करण्यासाठी कोणता पदार्थ कशा पद्धतीने खावा, याविषयी डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती वाचा. ही माहिती आहारतज्ज्ञांनी dt.shwetashahpanchal या पेजवर शेअर केली आहे.
1) आले :
मासिक पाळीदरम्यान अनेकजणींचे पोट खूप दुखते. कंबर, पाठीमध्ये वेदना होतात. पोटऱ्या ओढल्यासारख्या वाटतात. हा त्रास कमी करण्यासाठी आल्याचा चहा किंवा काढा करा आणि गरम असतानाच प्या. चवीसाठी त्यात थोडा गूळ घाला. यामुळे मासिक पाळीतल्या वेदना बऱ्याच प्रमाणात कमी होतील.
2) लवंग :
जर हिरड्या ठणकत असतील, दाढ दुखत असेल तर अशावेळी त्या ठिकाणी थोडावेळ लवंग दाबून धरा. लवंगमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक असतात. यामुळे दातांचं दुखणं कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल.
3) लसूण :
जर जॉईंटपेनचा त्रास होत असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी लसूण अतिशय उपयुक्त ठरतो. यासाठी तिळाच्या तेलामध्ये काही लसूण पाकळ्या ठेचून टाका. हे तेल थोडं उकळून घ्या. हे तेल कोमट झालं की त्याने दुखणाऱ्या ठिकाणी हलक्या हाताने मालिश करा.
4) हळद :
दुखऱ्या भागावर किंवा जखमेवर हळद लावण्याचा उपाय आपल्याला माहितीच आहे. अंगात कणकण असेल, अंगदुखी असेल तर अशावेळीही हळदीचा काढा पिणं उपयोगी ठरतं.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |