09:47pm | Apr 09, 2023 |
भाग - 2
सातारा : सातारा शहराच्या इतिहासात न भूतो, न भविष्यती असे वेगवेगळे कांड घडवून आणणार्या ‘बंटी-बबली’चा पर्दाफाश ‘सातारा टुडे’ने केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सातार्यातील नक्की ‘बंटी-बबली’ कोण, याचा शोध अनेकांनी फेसबुकसह इन्स्टाग्राम तसेच तत्सम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घ्यायला सुरुवात केली आहे. गेली पाच-सहा वर्षे पीएमओच्या नावाखाली निर्विकार चेहरा घेवून अनेकांना डोक्यावर टाकणार्या बबलीचा मात्र नूर पुरता पालटला असून बंटी मात्र सिक्स्टी-नाईनटीच्या कैफात गोव्यात जिवाचा ‘बिग डॅडी’ करीत आहे.
सातारा जिल्ह्याला विपुल असा वैचारिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा आहे. याच मातीमध्ये क्रांतिज्योजी सावित्रीमाई फुले, धावडशीत जन्मलेल्या आणि ब्रिटीशांना आपल्या तलवारीचे पाणी पाजणार्या झाशीच्या राणीचा जन्मही याच सातारा भूमीत झाला. अशा या भूमीमध्ये एका दाम्पत्याच्या पोटी ‘करंटी’ जन्माला आली. मुलीचा जन्मदर वाढावा म्हणून सातारा जि.प.ने नकुसा योजना जन्माला घातली. याच योजनेमुळे सातारा जिल्ह्यामध्ये मुलींचा घटलेला जन्मदर पुन्हा वाढला. मात्र कधी-कधी हव्याहव्याशा वाटणार्या नकुसा पोटी जन्माला आल्यानंतर तिच्या आई-वडिलांनाही पश्चाताप होतो. कदाचित हाच पश्चाताप आज पंतप्रधान कार्यालयातील बोगस सल्लागार म्हणून मिरवणार्या बबलीच्या पालकांनाही होत असावा. असो. कोणी पश्चाताप करावा, अथवा करुन घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतू आपली पोरगी काय करते, याकडेही वेळीच लक्ष घातले असते तर औट घटकेचा आसुरी आनंद टाळता येवू शकला असता.
बोगस उप जिल्हाधिकारी, कुठलीतरी अधीक्षक... अशा पोकळ बाता मारुन बबलीने आजपावेतो पत्रकारांसह अनेकांना गंडवले. अजित डोवाल, डॉ. श्रीकर परदेशी तसेच पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन प्रधान सचिव न्रिपेंद्र मिश्रा यांच्या नावाचा वापर करुन शेकडोंना कोट्यवधींचा गंडा घातला. यावेळी तिने देशाचे गृहमंत्री अमित शहांनाही सोडले नाही. अनेक अधिकार्यांचे फोन नंबर त्यांच्या नावाने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन थांबा, अमित भाई शहांना फोन करते,... फोनवर डॅडा हा लगेच रिप्लाय येत होता. परंतू प्रत्यक्षात मात्र हा फोन तिच्याच जवळच्या पंटरला जात होता. सगळाच झोल-झपाटा होता. डोवाल-न्रिपेंद्र मिश्रा झाले. न्रिपेंद्र मिश्रा यांच्यापर्यंत ठीक होतं. परंतू थेट अमित शहा म्हटल्यानंतर समोरचा गप्पगार व्हायचा, मुकाट्याने सोबत आणलेली बॅग स्वाधीन करायचा आणि आल्या पावली परत जायचा. थेट दोन नंबरशीच डायरेक्ट फोन म्हटल्यानंतर टेंडरच काय, पूर्ण ट्रेझरीच (कोषागार) आपले... या स्वप्नात तो रममाण व्हायचा. बबलीने आपल्या निर्विकार चेहर्याचा आणि स्वभावाचा मुक्तहस्ते वापर केला. कधीकाळी एक्टिवा दुचाकीवरुन फिरणारी बीएमडब्लू मधून फिरु लागल्याने सातार्यातील अनेक मी-मी म्हणणारे हिरो तिच्याभोवती पिंगा घालू लागले. फुलाभोवती जसा भ्रमर फिरावा, असे अनेक भ्रमर राजवाड्यापासून पोवई नाका व पोवई नाक्यापासून शाहू नगरापर्यंत फिरु लागले. यामध्ये अनेक कमनशिबी ठरले. गण्याला मात्र पीएमओ सोडतीची लॉटरी लागली.
शिक्षण क्षेत्रात रमणार्या बापाच्या पोटी हे वांड कार्ट जन्माला आलं. पुण्यात एका पोरीचा अपघातात जीव घेतल्यानंतर (अपघात की खून? याबाबत अनेक मत-मतांतरे आहेत) हे वांड कार्ट सातार्यात आलं. बीएमडब्लू मधील बबलीला पटवल्यानंतर ‘बंटी-बबली’ ही जोडगोळी सातार्यात फेमस झाली. ठकास महाठक भेटल्यानंतर काय होते, ते त्यांनी गंडवलेल्यांना कळून चुकले आहे. सातार्यासह राज्यभरात यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या कनेक्शनचा बाजार भरवला. कराड उत्तरेतील आणि फलटणातील बड्या नेत्यांची नावे घेवून यांनी अनेकांची जिरवली. पैसे परत मागायला आला तर गोळ्या घालीन, अशा धमक्याही बोगस इंटरनॅशनल वेपन लायसन्सच्या बंदुकीच्या साक्षीने देण्यात आल्या. कोणाला संशय आलाच तर आम्ही पीएमओ चे अंडर कव्हर सल्लागार आहोत, त्यामुळे माझ्याशी बोलताना अदबीने बोलायचं. जर काय वाटले तर गुगल वर माझं नाव शोधायचं, असा दम भरला जायचा. गुगल वर शोधून झाल्यानंतर शोधकर्ताही चाट पडायचा. आयला, महाराष्ट्रातील आघाडीच्या दैनिकांनी व वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार झाल्याची तिची बातमी कोणतीही शहानिशा न करता छापल्याने व प्रकाशित केल्याने त्यांचा नव्हेतर बबलीचा टीआरपी वाढलाय.
गुगल सर्च इंजिन ज्या पद्धतीने अनैतिकही दाखवते. पण हल्ली अनैतिक वर सरकारने बंदी घातली आहे. पण अनेकांनी व्हीपीएन अर्थात व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरुन सरकारलाही माती खायला लावली आहे. अशीच माती आता बबलीने ज्यांना गंडवले आहे, त्यांनाही खायची वेळ आली आहे. इंटरनेटच्या मोहजालात कोणतीही शहानिशा न करता अनेकजण बबलीच्या ट्रॅप मध्ये फसले गेले आणि कोट्यवधी रुपयांचा चुना लावून घेतला. अर्थात यालाही कोणतीही शहानिशा न करता पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागारपदी निवड झाल्याची बातमी देवून बबलीला फेमस करणार्यांचाही तेवढाच हात आहे.
बबलीला बंटी भेटल्यानंतर बबलीने कमविलेल्या पैशावर बंटीचा डोळा प्रथमपासूनच होता. बबलीपेक्षा बंटी पाच वर्षाने मोठा. पुण्या-मुंबईमध्ये राहून त्याने दुनियादारी केली. शिक्षण क्षेत्रात रमणार्या बापाने पॉकेट मनी द्यायचा बंद केल्यानंतर स्कॉच पिणारा बंटी देशी वर आला. सिगारेटमध्ये शासनाने बंदी घातलेली जडी-बूटी टाकून पुणे शहरात हुंदडणार्याला शेवटी साताराच मानवले. बबली भेटली, बबलीचा पैसा भेटला. पैसा गाठीशी असल्यानंतर अनेक उद्योगही सुचतात. तद्वत आता आपण व्हाईट कॉलर झाले पाहिजे, त्यानुसार त्यांनी सदर बझारात कसलेतरी हॉटेल चालवायला घेतले. हॉटेल म्हटल्यानंतर त्यामधील पंचपक्वान्नांचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहकही येणार. ग्राहक येत असत. परंतू सकाळपासूनच ‘बंटी-बबली’चा ठिश्श्या सुरु होत. रेड लेबल पासून सुरु झालेला प्रवास ओल्ड मंक पर्यंत येवून थांबायचा. सकाळी सुरु झालेली पेगची भैरवी मध्यरात्रीपर्यंत संपायची. दिवसभर नुसता धिंगाणा... मालकच असे म्हटल्यानंतर ग्राहकही तसलेच येणार. हळूहळू खव्वैय्यांनी त्यांच्या हॉटेलकडे पाठ फिरवली आणि काहीच दिवसांत हेही हॉटेल बंद पडले. आता करायचं काय? आता थेट गोवा, असे म्हणत गोव्यातील कसिनो त्यांना खुनावू लागले. काय ते बिग डॅडी..., काय ते डेल्टिन जॅक... थेट अमेरिकेतील लास वेगास चाच फील. लोकांना टोपी घालून कमविलेले कोट्यवधी यांनी कसिनोत उडवले. जाणकार सांगतात, एकदा बंटीने तर चक्क तीन लाख रुपयांची टीप कसिनो डीलरला दिली होती. ही टीप बघूनच कसिनोतील इतर डिलर्सने डोळे पांढरे केले होते. आयुष्यभर कसिनोत काम केले, कोणत्याही महानुभवाने एवढी मोठी टीप कोणत्याही डिलरला दिली नव्हती, अशा दु:खद भावना सातार्यातील अनेक कसिनोप्रेमींकडे व्यक्त केल्या होत्या.
पंतप्रधान कार्यालयापासून सुरु झालेला ‘बंटी-बबली’चा प्रवास गोव्यातील बिग डॅडी कसिनो पर्यंत येवून थांबला. बिग डॅडी या कसिनोचा मालक असलेल्या गोपाल गोयल कांडा यालाही आपल्या व्यस्त शेड्युलमधून सातार्यातील या ‘बंटी-बबली’ची दखल घ्यावीशी वाटली. पंतप्रधान कार्यालयाचा वापर करुन यांनी अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केली आणि याच पैशातून गोव्यातील कसिनोत अय्याशीही केली. आता हिच अय्याशी व्याजासह फेडायची वेळ आली आहे.
(क्रमश:)
जेवढ्या गाड्या नाहीत दोन्ही महाराजांकडे, त्यापेक्षा जास्त बंटी-बबलीकडे
2017 ते 2023 हा ‘बंटी-बबली’साठी सुवर्णकाळच. याच कालावधीत त्यांनी महाबळेश्वरात जावून गांधर्व विवाह केला. यासाठी सदर बझारमधील फेमस पंटरने मध्यस्ती केली. बंटी आणि बबलीचा बीएमडब्लू फाईव्ह सिरीजपासून सुरु झालेला प्रवास त्यांना लकी ठरला. यानंतर मात्र त्यांनी पाठि वळून पाहिलेच नाही. आण पैसे की घे गाडी, असा सपाटाच सुरु केला. त्यानंतर सफारी स्टॉर्म, पजेरो, इनोव्हा क्रेस्टा, रेज रोव्हर, दुचाकीमध्ये इम्पोर्टेड दुचाकी यामध्ये ड्युकाटी, ट्र्यूम्प आणि अशा बर्याच. आजपर्यंत असा माज सातार्यात भल्या-भल्यांनी केला नव्हता. सातार्यातील दोन्ही महाराजांनीही या गाड्यांचा ताफा आणि त्यांचे गॅरेज पाहून तोंडात बोट घालावे, असे हे कार आणि बाईकचे कलेक्शन.सातारचा बेन्टेक्स, डॅन बिल्झेरियन
‘बंटी-बबली’कडे खोर्याने पैसा आल्यानंतर सातार्यात बसण्यासारखा आणि पैसा उडवण्यासारखा माहोल नाही. गोवा हे इंटरनॅशनल डेस्टिनेशन. गाठीशी पैसा असल्यानंतर आणि कसिनोत जायचे झाले तर पोकर खेळायचे. पोकर खेळायचे झाले तर ते इंटरनॅशनल पोकर प्लेअर आणि इंटरनॅशनल सेलिब्रिटी प्ले-बॉय डॅन बिल्झेरियन सारखा ताल करायचा. त्याच्यासारखे फोटो आणि व्हिडिओ इंन्स्टाग्राम आणि फेसबुक वर टाकायचे. डॅन बिल्झेरियन हा इंटरनॅशनल सेलिब्रिटी आहे. तो चार्टड प्लेन ने डझनभर मदनिकांच्या गोतावळ्यात जगभर फिरत असतो. सातारचा बंटी मात्र हत्तीचे पिल्लु अर्थात बबलीच्या गळ्यात गळा घालून फिरतो. कुठे तो डॅन आणि कुठे हा सातारचा बेन्टेक्स बंटी? डॅन बिल्झेरियनचा नाद करायचा झाला तर खिशात पैसाच काय, पण अंगावर कापडंही राहणार नाहीत.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |