सातारा : वाई, जावळी परिसरात आज दुपारी ढगांच्या गडगडाटात एक तास मुसळधार अवकाळी पाऊस झाला. पाचगणी, महाबळेश्वर, खंडाळा येथे हलकासा पाऊस झाला. या पावसाने वातावरणात गारवा आला. त्यामुळे लोक सुखावल्याचे दिसून आले.
सातारा शहर परिसरात आज दुपारी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने सातारकरांना उकाड्यापासून थोडासा दिलासा दिला. या शिडकाव्यामुळे मातीमधील सुगंधाचाही अनेकांनी आनंद लुटला. मात्र, यानंतर वातावरण पुन्हा एकदा जैसे थे झाले. आज दुपारी वाई, जावळी परिसरात ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी सायंकाळी वाई, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात प्रथमच हलकासा पाऊस झाला होता. त्यामुळे रस्ता ओला झाला. परंतु या पावसाने थोडासा गारवा आल्याने लोक सुखावले आहेत.
हा पाऊस फक्त वाई, जावळी परिसरातच झाला. मात्र पावसाने धुंद वातावरण तयार केले. उत्तर कोरेगाव परिसरात जोरदार वारे वाहिले. वाई-पाचवड रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. जोरदार वारे वाहिल्यामुळे आंब्यांचा सडा रस्त्यावर पडला होता. वाई सुरूर मार्गावर वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत होवून वाहनधारकांची गैरसोय झाली.
खूप दिवसांनी पाऊस झाल्यामुळे दुपारी आलेल्या गारव्यानंतर सायंकाळी पुन्हा उकाडा जाणवायला लागला. सुरूर- महाबळेश्वर रस्त्यावर वाई शहाबाग फाट्यावर आंब्याचे मोठे झाड पडले होते. झाड काढण्याची कार्यवाही सुरु आहे. सायंकाळी उशिरा झाड हटवून वाहतुकीसाठी मार्ग सुरू करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |