08:51pm | Mar 04, 2023 |
कराड : विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथील ढोकरमाळ नावाच्या शिवारात घडली असून वनविभागाने बछड्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला आहे.
याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, धोंडेवाडी-नांदगाव खिंड दरम्यान ढोकरमाळ नावाचे शिवार आहे. या ठिकाणी विश्वनाथ महिपती काकडे यांची शेत विहीर आहे. काकडे पहाटे विहिरीतील पाण्याचा अंदाज घेण्यासाठी गेले असता पाण्यात मृत अवस्थेत बिबट्याचा बछडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती त्यांनी अन्य शेतकऱ्यांना दिली तसेच वनविभागाला कळवली. घटनेचे गांभीर्य ओळखून कराड वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृत बछड्याला जाळीच्या साह्याने विहिरीबाहेर काढून ताब्यात घेतले. बछड्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शोध वन विभागाचे कर्मचारी घेत आहेत.
कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक अभिजीत शेळके, सुभाष गुरव, सचिन खंडागळे, वनसेवक अमोल माने, धनाजी गावडे, भरत पवार, योगेश बडेकर, हनुमंत मिठारे यासह शेतकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. मृत बछडा मादी जातीचा आहे. सात-आठ महिन्यांचा असून अंदाजे 15 ते 20 किलो वजनाचा असल्याचे तुषार नवले यांनी सांगितले. तसेच शिकारीच्या शोधात तो विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |