11:19am | Jun 07, 2021 |
वाई : कोरोना संसर्गामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघातील औद्योगिक, पर्यटन, शेतकरी आदी क्षेत्रातील अर्थकारण बिघडले आहे. कोरोना संसर्गाची मोठी भीती लोकांच्या मनात आहे. यासाठी जनतेच्या मोफत लसीकरणाची स्वतंत्र मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. मकरंद पाटील यांनी केले आहे.
वाई नगरपालिकेच्या सभागृहात आ. मकरंद पाटील यांनी पुढील महिन्यात मतदारसंघात राबविण्यात येणार्या मोफत लसीकरण मोहिमेबाबत बैठक बोलाविली होती. यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, मुख्याधिकारी विद्या पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप यादव, उपनगराध्यक्ष अनिल सावंत व नगरसेवक आदी उपस्थित होते.
जानेवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसर्या लाटेला सुरुवात झाली आहे. या लाटेमध्ये अनेक लोक बाधित झाले, कुटुंबे उध्वस्त झाली, लोकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे बंद पडले आणि अर्थकारण बिघडले. यापुढे तिसरी लाट येण्याचा धोका आहे. यामध्ये जास्तीत जास्त लहान मुले बाधित होतील, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. आपण तिसर्या लाटेला सामोरे जाण्यासाठी मतदारसंघात आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करत आहोत व केल्याही आहेत. लसीकरण झालेल्या व्यक्तीला कोरोना होत नाही आणि झाला तरी त्यात त्याचा मृत्यू होत नाही, असं तज्ञांचे मत आहे. यासाठी लसीकरण हाच उपाय आहे. परंतु पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्यामुळे सध्या लोकांमध्ये लसीकरणाबाबत तीव्र असंतोष आहे. लस तोकडी मिळत आहे, लस उपलब्ध होण्यामध्ये अनियमितता आहे. एकूणच लोकांचे जनजीवन आणि अर्थकारण सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अधिकची लस उपलब्ध करून देण्यासाठी शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली.त्याप्रमाणे सिरम इन्स्टिट्यूट मध्ये डॉक्टर जाधव यांच्या बरोबर माझे बोलणे झाले. त्यांनी उपलस उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समित्या नगरपालिका तसेच उद्योजक बँका पतसंस्था यांनी सहकार्य करावे. नगरपालिकांचा निधी उपलब्ध होण्याबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आज महाबळेश्वर च्या बैठकीत चर्चा झाली आहे. तळागाळातील लोकांपर्यंत सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी राजकारण विरहित व पक्षीय हीत बाजूला ठेवून योगदान द्यावे, असे आवाहन आ. पाटील यांनी केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बचुटे आणि मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी कोरोना परिस्थितीचा व लसीकरण मोहिमेचा आढावा सादर केला.
या बैठकीला वाई व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. मागील दोन महिन्यांपासून शहरातील व्यापार पूर्णतः बंद असल्यामुळे त्यांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी ताबडतोब शहरातील प्रतीबंधक क्षेत्र खुले करावे, अशी मागणी केली. अन्यथा व्यापारी उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा दिला. याबाबत पुढील आठवड्यात सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन आ. मकरंद पाटील यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |