सातारा : गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपयेलिटर व दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदानच्या मागणी करता आज 1 ऑगस्ट रोजी भाजपा व मित्र पक्ष यांच्यावतीने दूध एल्गार आंदोलन देगांव फाटा, ता. सातारा येथे करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे व इतर तालुका पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत असताना बँकेकडून आकारला जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणे, युरिया खताचा तुटवडा, काळाबाजार, कोकणातील शेतकर्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि आजची या दुष्काळाची परिस्थिती या संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या कोरोनाच्या काळात दुधाच्या विक्रीमध्ये 30 टक्क्यांपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्याने दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था सहकारी दूध संस्था संघांकडून 15 ते 16 रुपये लिटर भावाने दूध खरेदी करण्याची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात सात लाख लिटर दूध खरेदी केले जात आहे. मंत्र्यांशी लागेबांधे असलेल्या दूध संघांकडून शासन दूध विकत घेत आहे. अशा पद्धतीने शेतकरी व दूध उत्पादकांना शासनाने वार्यावर सोडले आहे. आदी तक्रारींसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध गावातून आलेले दूध उत्पादक शेतकर्यांनी निषेध करत दुधाला दरवाढ झालीच पाहिजे या मुद्द्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवण्यात आला. दूध आणि दुधाची भुकटी यांच्या दरासंदर्भात सरकारने त्वरित दखल घ्यावी आणि दूध उत्पादक शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भारतीय जनता पक्ष हा गोरगरीब शेतकर्यांच्या आणि दूध उत्पादक बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही यावेळी सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे यांनी दिली. दूध, दुधाची भुकटी यासंदर्भात दराबद्दल सरकारने त्वरित दखल घ्यावी आणि दूध उत्पादक शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सरचिटणीस गणेश पालखे, सरचिटणीस सुनिल फडतरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष हेमंत शिंदे, सुनील जाधव, विठ्ठल बलशेठवार, विभाग प्रमुख सुजित साबळे युवा मोर्चा सातारा तालुका अध्यक्ष तेजस काकडे युवा मोर्चा उपाध्यक्ष, निलेश शहा, स्वप्नील बोराटे, बंडा पवार, भीमराव लोखंडे मा. सरपंच खेड, पपू डांगे, रवी जगदाळे, डॉ. रमाकांत साठे, राजेंद्र चव्हाण, चैतन्य पवार, शंकर जाधव, संदिप शिंदे, संतोष जाधव, शिवाजी निकम, अरुण माने, अर्जुन कोकाटे, दूध उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |