11:00pm | Oct 15, 2020 |
सातारा : वाढे फाटा ते फलटण जात असताना डम्पर चालकास दम देऊन लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या सातारा तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अविनाश विलास दडस रा. आरफळ ता. जि. सातारा असे गुन्हेगाराचे नाव आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. १२ऑक्टोबर २०२० रोजी डम्पर चालक हा वाढे फाटा ते फलटण रोडने डम्पर घेवून जात असताना आरफळ (ता.जि. सातारा गावचे हद्दीमध्ये डम्पर हा एअर पकडलेने बंद पडलेला होता. त्यावेळी एका छोटा टेम्पो तेथे थांबला. त्यामधील चालकाने त्या डम्पर चालकास तु काही दिवसापूर्वी माझ्या गाडीला धडक दिली होती. तू माझ्या मालकाला भेटायला चल असे म्हणाला. डम्पर चालकाने माझ्याकडून कोणताही अपघात झालेला नाही, असे सांगितले तरी देखील खात्री करण्यासाठी त्या चालकासोबत मालकास भेटण्यास जावू असे सांगितले. त्यावेळी टेम्पो चालकाने त्याचे टेम्पोमध्ये बसून चडूथ (ता.जि. सातारा) गावचे हद्ददीमध्ये एक कॅनालवर निर्जनस्थळीं घेवून गेला. तेथे गेल्यावर डम्पर चालकाने मला याठिकाणी का आणले आहे, तुझे मालक कुठे आहेत याबाबत विचारणा केली असता टेम्पो चालकाने मालक वगैरे काही नाही असे सांगून टेम्पो चालकाने डंम्पर चालकाचे खिशातील पैसे जबरदस्तीने काढू लागल्यावर डंम्पर चालकाने त्यास विरोध केला. परंतू टेम्पो चालकाने डंम्पर चालकाने जबरदस्ती करून झटापट करून डंम्पर चालकाचे खिशातील दोन हजार रूपये घेवून टेम्पो घेवून पळून गेला त्याबाबत बाळकृष्ण दत्तात्रय भुजबळ (रा. झणझणे सासवड ता. फलटण जि. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाणेस तक्रार दिली होती.हा प्रकार गंभीर असल्याने संशयित इसमांना पकडण्याबाबत पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक सातारा श्रीमती आंचल यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सजन हंकारे, पोलीस निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे यांनी डी.बी. पथकास मार्गदर्शन व सुचना करून संशयितांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे सातारा डी.बी. पथकाने फिर्यादीकडून आरोपीबाबत कौशल्यपूर्वक माहिती घेवून आरोपीचे वर्णन प्राप्त केले. वर्णनावरून या गुन्हयाचे चौकशी करीता अविनाश विलास दडस( रा. आरफळ ता. जि. सातारा) या संशयितास ताब्यात घेतले.हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर लुटमारीचे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.सध्या तो तडीपार कालावधी संपलेला असल्याने त्याचे गावी आलेला होता. दडस हा अत्यंत सराईत गुन्हेगार असल्याने त्याने पोलीसांना प्राथमिक चौकशीमध्ये उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतू पोलीसांनी केलेल्या प्रश्नाचे भडीमारापुढे तो बोलता झाला व त्याने सदर केलेल्या गुन्हयाची कबुली दिली.गुन्हा घडलेपासून पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी व डी.बी. पथकाने अत्यंत जलदगतीने तपासाची सुत्रे हलविलेने व संशयिताची वर्णन कौशल्यपूर्वक माहिती प्राप्त करून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास ताब्यात घेवून हा गंभीर गुन्हा उघड केलेला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक सातारा आंचल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजन हंकारे पोलीस, डी.बी.पथकातील पो.हवा. दादा परिहार, पो.ना. सुजीत भोसले, पो.कॉ. सागर निकम, पो.कॉ. सतीश पवार, पो.कॉ. नितीराज थोरात,पो.कॉ. संदीप कुंभार, पो.ना. निलेश जाधव, पो.ना. ओंकार यादव, पो.ना. अमित माने यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी हे करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |