कराड : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. परंतु, छगन भुजबळ राईचा पर्वत करत आहेत. ते ज्येष्ठ नेते असून आरक्षणावरून अशा प्रकारची वक्तव्ये करणे दुर्देव आहे. त्यांनी आपली मुक्तातफळे उधळणे थांबवावे, असा सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणा संदर्भात सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लागवला.
मुंबईहून कोल्हापूरला जाताना कराड येथे एका हॉटेलवर थांबले असताना पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
मंत्री विखे-पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. याबाबत कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. याबाबत मनोज जरांगे-पाटील यांनाही आम्ही लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे. मराठा समाज मागत असलेले आरक्षण हा त्यांचा अधिकर आहे. सरकार त्याच्यावर सकारात्मक विचार करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, भुजबळ विनाकरण राईचा पर्वत का करत आहेत? माहिती नाही. मात्र, त्यांनी मुक्तफळे उधळणे थांबवावे.
दुध दराच्या आंदोलनाबात विचारले असता मंत्री विखे-पाटील म्हणाले, दूधाला प्रति लिटर किमान ३४रुपये दर दिला पाहिजे. काही दूध संघ सरकारचा आदेश पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्रात सध्या ३० टक्के दुधात भेसळ आहे. हे तात्काळ थांबवणे गरजेचे आहे. दुधाच्या भावाबाबत खासगी दुध संघ ऐकणार नसतील, तर त्यांचे परवाने रद्द करावे लागतील, असे ते यावेळी म्हणाले.
राज्यात आमचे सरकार असते, तर मराठा समाजाला आरक्षण दिले असते, या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर वक्तव्यार बोलताना, मंत्री विखे-पाटील म्हणाले, दुर्दैवाने महाराष्ट्रात झालेली काँग्रेसची पिछेहाट व वाताहतीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच आघाडीचे सरकार गेले असून त्यांनीच सरकार घालवण्याचे काम केले आहे. त्यांची सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवणे, यात काही तथ्य नाही.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |