07:51pm | Aug 26, 2023 |
लोणंद : खंडाळा तालुक्यातील बाळूपाटलाची वाडी येथे दुचाकीस्वारास धडक देवून पळून गेलेल्या ट्रकचालकास अहमदनगर जिल्ह्यात जावून लोणंद पोलिसांनी अटक केली असून या कारवाईत ट्रक देखील जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास लोणंद ते नीरा रस्त्यावर भवानी मातेच्या मंदिराजवळ मोटार सायकल स्वार अविनाश लक्ष्मण बर्गे (रा. दत्तनगर, कोरेगाव) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली होती. घटनेनंतर जखमीला उपचारासाठी न नेता संबंधित चालक वाहनासह पळून गेला होता. त्याबाबत लोणंद पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व त्याचे सहकार्यांनी लोणंद येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी धडक दिलेले अनोळखी वाहन हे हंगेश्वर प्रसन्न असे लिहलेला ट्रक असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, अंधारामुळे या ट्रकच्या नंबरची तसेच चालकाची खात्री होत नसल्याने मोरगाव ते लोणंद व जेजुरी ते लोणंद तसेच लोणंद ते तासवडे टोलनाका या रोडचे 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेजमध्ये हंगेश्वर प्रसन्न असे लिहिलेल्या सर्व ट्रकांची पाहणी केली. या तपासात अपघातातील संशयित ट्रक हा हंगेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या ठिकाणी जावून तपास करून सदरचा ट्रक हा एमएच 16 टी 6655 असल्याचे निष्पन्न करुन ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेत या अपघाताच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. ट्रक व ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशिल बी. भोसले, सहायक पोलीस निरीक्षक विशाल कदम, पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, आनंदा केंजळे, संतोष नाळे, अतुल कुंभार, सर्जेराव सुळ, नितीन भोसले, अवधुत धुमाळ, अभिजीत धनवट, केतन लाळगे, गोविंद आंधळे, प्रमोद क्षिरसागर, सुनिल नामदास तसेच जिविशा बीटचे अविनाश नलवडे यांनी सदरची कारवाईत सहभाग घेतला आहे. लोणंद पोलीस स्टेशनचे सुशिल बी. भोसले व विशाल कदम तसेच त्यांचे सहकार्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |

अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |