बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मात्र बारामतीच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. मतदान केंद्रावर मतदान करून सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या आहेत. काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे पोहचल्या. या राजकीय घडामोडीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
ऐन मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या घरी भेट दिल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. सुप्रिया सुळेंनी ही भेट का घेतली हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र सातत्याने सुप्रिया सुळेंकडून आमचे राजकीय मतभेद असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत असं सांगत होते. त्यात सुप्रिया सुळे यांनी मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या घरी दाखल होणे यातून मतदारांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीच्या राजकीय आखाड्यात शरद पवार आणि अजित पवार एकमेकांसमोर उभे आहेत. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात अजित पवार महायुतीत आल्याने पवार कुटुंबातील वाद समोर आले. या निवडणुकीच्या प्रचारावेळी पवार कुटुंबातील सगळेच मैदानात उतरले होते. त्यात अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारही त्यांच्याविरोधात जात सुप्रिया सुळेंचा प्रचार करत होते.
बारामतीच्या शेवटच्या सभेतही शरद पवार गटाकडून अजित पवारांवर निशाणा साधला होता. रोहित पवार यांनी आक्रमकपणे अजित पवारांवर टीका करत भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर रोहित पवारांच्या टीकेवर अजित पवारांनीही त्यांची खिल्ली उडवली होती. त्यात मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे या काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानी गेल्याने कुटुंब म्हणून आजही आम्ही एकत्रित आहोत असा संदेश सुप्रिया सुळेंना द्यायचा आहे का असादेखील प्रश्न निर्माण होतो.
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |