12:06pm | Aug 22, 2023 |
सातारा : शहीद जवान वैभव संपतराव भोईटे यांच्या पार्थिवावर आज राजाळे, ता. फलटण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी भरत बोडरे, बीड जिल्हा कारागृह अधीक्षक विलास भोईटे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, राजाळेच्या सरपंच स्वाती दौंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसाहेब काळे यांनी शहीद जवान वैभव भोईटे यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. शहीद वैभव भोईटे यांचे वडील संपतराव भोईटे यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. लडाख येथे देशसेवा बजावत असताना झालेल्या अपघातात वैभव भोईटे शहीद झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पती, पत्नी व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |

सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |