20 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी

by Team Satara Today | published on : 08 August 2025


सातारा : सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम  (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम  37 (1) (3) अन्वये दिनांक   20 ऑगस्ट 2025 रोजीच्या  रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमाव बंदी आदेश जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केला आहे.

ज्या लोकांनी शांततेचा मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असेल त्याचवेळी पोलीस विभागाची (पोलीस अधिक्षक/संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक) यांची लेखी पूर्व परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्रावण महिन्यातील उपवासाला सकाळच्या नाश्त्यात बनवा कुरकुरीत मेदू वडे

संबंधित बातम्या