मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी मूळ तक्रारदार सुरिंदर अरोरा यांनी मंगळवारी उच्च न्यायालयाकडे मागितली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात यावी, अशी मागणी आपल्याला करायची आहे, असे तक्रारदारांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
अरोरा यांच्या वतीने ॲड. सतीश तळेकर यांनी न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे याचिका दाखल केली. मात्र, खंडपीठाने आपण या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही, असे म्हटल्याने अरोरा यांना याचिकेत सुधारणा करण्यासाठी पर्यायी खंडपीठाकडून परवानगी घ्यावी लागेल.
तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा :
1) शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबई ईओडब्ल्यूने पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर अरोरा यांनी जानेवारी २०२१ मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
2) काही दिवसांपूर्वीच ईओडब्ल्यूने दुसरा क्लोजर रिपोर्ट दाखल करत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, रोहित पवार व अन्य बड्या राजकीय नेत्यांना क्लीन चिट दिली. त्यामुळे अरोरा यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला. ईडी व सीबीआय या तपास यंत्रणा सरकारी दबावापासून स्वतंत्र नसल्याने एसआयटी नेमण्यात यावी व या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |