09:59pm | Apr 08, 2024 |
कराड : यशवंतराव चव्हाणांनी स्वत:च्या वैयक्तिक जीवनाकडे कधी लक्ष दिले नाही. संपूर्ण आयुष्य जनहितासाठी समर्पित केले. त्यामुळे जनतेच्या हृदयात ते घर करून राहिल्याचे गौरवोद्गार खासदार उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये काढले.
दिवंगत माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. उदयनराजे पुढे म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे नेतृत्व करणारे उपपंतप्रधानही होते. अशा थोर व्यक्तीच्या समाधीस्थळी नतमस्तक होणे हे मी माझे कर्तव्य समजतो. मी लहान असताना अनेकदा ते आमच्या आजी राजमाता सुमित्राराजे यांना भेटायला यायचे तेंव्हा त्यांना जवळून बघण्याचा योग आला. माझ्या वडिलांनाही ते आवर्जून भेटायचे. एखादी व्यक्ती जेव्हा योग्य दिशेने वाटचाल करत असते. त्यावेळेस आमच्या घराण्याने त्यांना पाठबळ देणे किंवा त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आज याठिकाणी आल्यानंतर फार बरे वाटले. चव्हाणसाहेबांच्या विचारातून खूप काही घेण्यासारखे असते व योग्य दिशा मिळते असे उदयनराजेंनी सांगितले.
मोठ्या लग्नाच्या यादीला वेळ जातोच
आपली दिल्लीवारी आणि भाजपाकडून उमेदवारीच्या अनेक याद्या प्रसिध्द झाल्या. पण, क्लीन चेहरा असतानाही आपल्या उमेदवारीच्या घोषणेला वेळ लागत आहे? अशी पत्रकारांनी विचारणा करताच उदयनराजे म्हणाले, क्लीन चेहरा म्हटल्याबद्दल थॅंक्यु. पण, तरीही सॉरी, कारण जरा दाढी करायचे राहून गेले. लग्नातही आपण याद्या करतोच ना? परंतु, ज्यावेळेस मोठं लग्न असते त्यावेळेस याद्यांमध्ये बरेच काही असते ना? त्याच्यात हे पाहिजे ते पाहिजे हे नको ते नको त्यामुळे मोठ्या लग्नाच्या यादीला वेळ जातोच असे उदयनराजे मिश्कीलपणे म्हणाले.
उदयनराजेंचेच प्रतिप्रश्न
आजच्या मेळाव्यांना महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित राहतील का? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, यात तुम्ही जर शंका घेत असाल तर, याचा अर्थ मी मेळाव्याला जाऊ नये का? नेते येणार का, असे का म्हणताय? असे प्रतिप्रश्न त्यांनी केले. जेव्हा मेळावा आपण घेतो तेव्हा लोक एकत्रितपणे व्यथा मांडतात, विचारांची देवाणघेवाण होते. त्यातूनच मार्ग निघतो. त्यामुळे हे मेळावे महत्वाचे असल्याचे खासदार उदयनराजेंनी स्पष्ट केले.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |