11:13pm | Apr 05, 2023 |
सातारा : घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितास लोणंद पोलिसांनी मध्यप्रदेश मधून जेरबंद केले असून चोरीच्या गुन्ह्यातील 9 लाख 86 हजार 900 रुपयांची रोकड देखील हस्तगत करण्यात आली आहे. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुखेड, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील रिअल ग्रीन फ्लोअर मिल प्रा. लि. या कंपनीच्या ऑफिसच्या खिडकीच्या काचा कोणीतरी अनोळखी चोरट्याने काढुन, आतमध्ये प्रवेश करुन ऑफिस केबीनच्या आतील टेबल ड्राव्हरचे लॉक तोडुन त्यामधील 9 लाख 91 हजार 500 रुपये घरफोडी चोरी करुन चोरुन नेले होते. त्याबाबत समीर नुरमहंमद इनामदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास चालु असताना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विशाल वायकर व पोउनि गणेश माने यांनी गुन्ह्याचे गांभिर्य ओळखुन सीसीटिव्ही फुटेज व तांत्रीक माहीतीच्या आधारे माहिती प्राप्त करुन आरोपी निष्पन्न करण्यात यश मिळवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी तात्काळ लोणंद पोलीस ठाण्याचे अंमलदार सर्जेराव सुळ, फैय्याज शेख, विठ्ठल काळे यांचे खास पथक तयार करुन खाजगी वाहनाने मध्यप्रदेश राज्यातील रिवा या जिल्ह्यात पाठविले. तेथे मध्यप्रदेश मधील रिवा जिल्ह्यातील वैकुंठपुर पोलीस ठाण्याच्या पोलिसांची मदत घेवुन संशयीत विरेंद्रकुमार रामफल वर्मा वय 32, रा.बेदुहुवा, ता.सिरमोर, जिल्हा रिवा, राज्य मध्यप्रदेश यास ताब्यात घेवून त्याच्याकडुन गुन्ह्यातील चोरुन नेलेल्या रक्कमेपैकी रोख 9 लाख 86 हजार 900 रुपये जप्त करण्यात आले आहेत. विरेद्रकुमार रामफल वर्मा यास अटक करुन त्यास खंडाळा न्यायालयात हजर केले असता त्याची दि. 6 रोजी पर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे. या गुन्ह्याचा तपास गणेश माने व अवधुत धुमाळ करीत आहेत,
घडलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी तपासाबाबत योग्य त्या सूचना दिल्या. लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल के.वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, तसेच पोलीस अंमलदार सर्जराव सुळ, फैय्याज शेख, विठ्ठल काळे, अमोल पवार, अविनाश शिंदे यांनी परिश्रम घेवून गुन्हा घडल्यानंतर 24 तासाच्या आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे, या कारवाईत सहभागी झालेल्या लोणंद पोलीस ठाण्याच्या सर्व पथकाचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी अभिनंदन केले आहे.
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |