10:05pm | Jul 14, 2023 |
फलटण : फलटण, कोरेगाव, माण- खटाव यासह संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेले सिंचनाचे सर्व प्रकल्प केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून आपण मार्गी लावलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन प्रकल्प मार्गी लावले असून आता आगामी काळामध्ये कोणालाही पाणी प्रश्नावर निवडणूक लढवता येणार नाही, असे स्पष्ट मत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
कोळकी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टी प्रदेशचे प्रतिनिधी जयकुमार शिंदे, भारतीय जनता पार्टी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे संयोजक सचिन कांबळे पाटील, युवा नेते लतीफ भाई तांबोळी, नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे यांच्यासह विविध मान्यवर व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या महिन्यात फलटण तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची कामे मार्गो लागली आहेत. त्यामध्ये बारामती रेल्वे, धोम - बलकवडी बारमाही करण्याचे टेंडर, नीरा - देवधरचे विविध सुमारे 550 कोटी रुपयांचे टेंडर, अजून सुमारे 200 कोटींचे नीरा - देवधरचे टेंडर प्रकाशित करण्यात आले आहे. काल कृष्णा फ्लॅड डायव्हर्जन प्रकल्पला काल राज्य सरकारने मान्यता दिली. याचे फक्त सर्वेक्षणचे टेंडर सुमारे 50 कोटींच्या वर आहे. हे फलटणमार्गे जाणार आहे. यामध्ये कृष्णेचे पाणी नीरा नदीत बाणगंगा नदीमार्गे जाणार आहे; यामध्ये जवळपास 5 TMC पाणी हे फलटण तालुक्यासाठी आरक्षित करणार आहे. यामध्ये बाणगंगा धरण भरून सुद्धा बाणगंगा नदी बारमाही करण्यासाठी पाणी आरक्षित करण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत, असेही खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
कृष्णा - भीमा स्थिरीकरणामध्ये हे फायदे असणार आहेत. यासोबतच या प्रकल्पाममधून आपण अतिरिक्त पाणी हे भाटघर, वीर धरणात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानू शकत नाही; त्यांचे आभार मानायचे कसे हेच कळत नाही; दुष्काळी भाग हा कलंक आता कायमस्वरूपी पुसणार आहे. कृष्णा फ्लॅड डायव्हर्जन प्रोजेक्टमुळे फलटण, माण व माढा लोकसभा मतदारसंघाचे सिंचन चित्र आता बदलणार आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
...म्हणून शरद पवारांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प रखडवला
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामधील दुष्काळी भागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या कृष्णा - भीमा स्थिरीकरण या प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांचेच आहे. विजयसिंह मोहिते - पाटील यांना श्रेय जाऊ नये; म्हणूनच शरद पवार यांनी एवढी वर्ष कृष्णा-भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प रखडवला होता, असा घणाघाती आरोप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.
यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, कृष्णा-भीमा स्थिरीकरण या प्रकल्पामध्ये काही सुधारणा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा प्रकल्प पुन्हा पुढे नेलेला आहे. कृष्णा - भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनाच जाते. या प्रकल्पासाठी विजयसिंह मोहिते-पाटील यांचे असलेले योगदान कधीही विसरता येणार नाही.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |