04:35pm | Apr 27, 2024 |
मणिपूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये मागच्या वर्षभरापासून कुकी आणि मैतेई समुदायामध्ये सुरू असलेला हिंसक संघर्ष काही केल्या थांबत नाही आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यानही मणिपूरमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. दरम्यान, कुकी उग्रवाद्यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मणिपूर पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास कुकी उग्रवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला. हे दोन्ही जवान मणिपूरमधील विष्णूपूर जिल्ह्यातील नारानसेना परिसरात तैनात असलेल्या सीआरपीएपच्या १२८ व्या बटालियनमधील होते.
याआधी दंगेखोरांनी कांगपोकपी, उखरूल आणि इंफाळ पूर्वमधील ट्रायजंक्शन जिल्ह्यात एकमेकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात कुकी समुदायातील २ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर थौबल जिल्ह्यातील हेईरोक आणि तेंगनौपाल दरम्यान दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर इंफाळ पूर्व जिल्ह्यातील मोइरंगपूरेल मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात कांगपोकपी आणि इंफाळ पूर्व या दोन्हीकडील सशस्त्र उग्रवादी सहभागी होते.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |

कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |