इटावा : भारतातील प्रवासी वाहतुकीचं सर्वात मोठं माध्यम हे रेल्वे आहे. देशभरात दररोज हजारो रेल्वेगाड्यांमधून लाखो प्रवासी ये जा करत असतात. अशा परिस्थितीत या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वेच्या कर्मचाऱ्यांवर असते. त्यांची एखादी चूक हजारो प्रवाशांचे प्राण संकटात आणू शकते. असाच धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. उत्तर प्रदेशमधील इटावा येथील उदी मोर स्टेशनवरील स्टेशन मास्तरला ऑन ड्युटी असताना डुलकी लागली. त्यामुळे सिग्नलची वाट पाहत पाटणा-कोटा एक्स्प्रेस स्टेशनवरच खोळंबून राहिली. या ट्रेनचा ड्रायव्हर सिग्नलची वाट पाहत जवळपास अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला.
इटावामधील उदी मोर रेल्वे स्टेशन हे आग्रा विभागामध्ये येते. उदी मोर हे छोटं पण महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहेय इथून आग्र्यासोबत झाशी येथून प्रयागराजकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्याही येथून जातात. या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, स्टेशन मास्तरला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. स्टेशन मास्तरांच्या बेफिकीरीमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. याबाबत अधिक माहिती देताना आग्रा रेल्वे विभागाचे पीआरओ प्रशस्ती श्रीवास्तव यांनी न्यूज एजन्सीला सांगितले की, आम्ही स्टेशन मास्तरांना आरोप पत्र बजावलं आहे. तसेच शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झोपी गेलेल्या स्टेशन मास्तराला जागवण्यासाठी ट्रेनच्या लोको पायलटने वारंवार हॉर्न वाजवून पाहिला. मात्र त्याला सुरुवातीला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, स्टेशन मास्तरांनी आपली चूक कबूल केली असून, त्यासाठी माफी मागितली आहे. आपण स्टेशनवर एकटेच होतो. तसेच सोबत असलेला कर्मचारी ट्रॅक निरीक्षणासाठी गेला होता, असे या स्टेशन मास्तकांनी सांगितले.
दरम्यान, विभागीय रेल्वे व्यवस्थापक तेज प्रकास अग्रवाल यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. आमचं लक्ष्य हे ट्रेनच्या वेळेमध्ये सुधारणा करण्यावर आहे. त्यामुळए कर्मचाऱ्यांच्या वक्तशीरपणामध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे या विभागातील ९० टक्के ट्रेन वेळेवर धावत असल्याचे सांगितले. या स्टेशन मास्तरांनी दाखवलेल्या बेफिकिरीमुळे इतरांच्या मेहतनीवर पाणी फिरवले. एवढंच नाही तर रेल्वे वाहतुकीसाठी धोका निर्माण केला, असे त्यांनी सांगितले.
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |