कुलगाम : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा वाँटेड दहशतवादी बासित दार याच्यासह तीन दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने ठार केले आहे. सोमवारी रात्री सुरू झालेला गोळीबार तब्बल ४० तासांनंतर गुरुवारी सकाळी संपला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांकडून अनेक शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
याबाबत भारतीय लष्कराने ट्विटरवर माहिती दिली. “कुलगाममधील रेडवानी पाइन येथे सुमारे ४० तास संयुक्त ऑपरेशन चालले. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चिनार कॉर्प्स काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहे, असंही ट्विटमध्ये म्हटले आहे.
दक्षिण काश्मीरमधील कुलगाममधील रेडवानी पाइन भागात सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार गोळीबार झाला. यानंतर भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक बासित दार १८ हून अधिक प्रकरणांमध्ये हवा होता. त्याच्यावर पोलिस आणि निरपराध नागरिकांच्या हत्येसह अल्पसंख्याकांवर हल्ले करण्याचे नियोजन असे गुन्हे दाखल आहेत.
गेल्या वर्षी, राष्ट्रीय तपास संस्थेने नागरिकांच्या हत्येप्रकरणी बासित दारवर १० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते आणि त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केले होते. त्याच्यावर २०११ मध्ये कुलगाममध्ये दोन बिगर स्थानिक मजुरांच्या हत्येचा आरोप होता.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |