02:29pm | Mar 20, 2024 |
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. देशभरातील १०२ मतदारसंघांमध्ये आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांची घोषणा होत आहे. उमेदवार प्रचार करू लागले आहेत. अशावेळी निवडणूक आयोगही सज्ज झाला आहे. आता मतदारांनाही सज्ज व्हायची वेळ आली आहे. यासाठी निवडणूक आयोगाने मतदानापूर्वी एक महत्वाचे काम करण्यास सांगितले आहे.
मतदारांनी त्यांचे मतदान ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक करण्यास सांगितले आहे. हे सक्तीचे नसले तरी निवडणुकीत घोळ होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे करणे गरजेचे आहे. यामुळे फेक मतदान, एकाच व्यक्तीचे अनेक मतदारसंघांत मतदान आदी गोष्टी टाळता येणार आहेत.
यासाठी काय करावे लागेल?
1) यासाठी तुम्हाला एनव्हीएसपीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे किंवा व्होटर सर्व्हिस पोर्टलवर जावे लागणार आहे.
2) जर रजिस्टर केलेले नसेल तर करावे लागणार आहे. जर केले असेल तर मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करावे लागणार आहे.
3) रजिस्टर नसाल तर साईन अप करावे लागणार आहे. मोबाईल, कॅप्चा कोड ओटीपी टाकून तुम्हाला रजिस्टर करता येणार आहे.
4) लॉगिन झाल्यावर आधार कनेक्शन पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून Form 6B भरावा. यानंतर आधार कार्ड आणि व्होटर आयडी लागणार आहे.
5) यानंतर मतदार ओळखपत्रावरील EPIC नंबर टाकून तुम्ही व्हेरिफाय आणि फिल फॉर्मवर क्लिक करावे. यानंतर भाषा निवडून तुम्ही अर्ज भरू शकता. नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यावर गरजेची माहिती भरावी लागणार आहे.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |

कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |