05:02pm | Feb 09, 2022 |
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे बुधवारी बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान दुर्देवी घटना घडली. बैलगाडा शर्यत सुरु असताना गाड्यासह बैलजोडी विहिरीत पडली. प्रचंड वेगाने बैलजोडी गाड्यासह विहिरीत कोसळली. या घटनेत दोन्ही बैलांचा तडफडून मृत्यू झाला असून घटनेनंतर बैलगाडा शर्यतप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली.
बिचकुले येथे या बैलगाडा शर्यतीचे परवानगी न घेता आयोजन करण्यात आले असल्याचे समोर येत आहे. बुधवारी या बैलगाडा शर्यती सुरु असताना एक बैलगाडा पळवणे सुरु असताना परिसरात असलेल्या एका विहिरात गाड्यासह बैलजोडी विहिरीत कोसळली. अचानकपणे घडलेल्या या घटनेने शर्यत परिसरात उपस्थितीत असलेल्या सर्वांमध्ये मोठी खळबळ उडाली. मात्र, मोठ्या वेगाने धावत निघालेली बैलजोडी विहिरीतच तडफडून मृत्य झाली असून या घटनेने बिचकुले परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
ही घटना घडल्यानंतर तातडीने कोणालाही काहीच करता आले नाही. मृत बैलजोडी विहिरीत तशीच पडून होती. बऱ्याच वेळाने मृत बैल बाहेर काढण्याचे काम स्थानिकांच्या मदतीने हाती घेण्यात आले आहे. या घटनेने इतर बैलगाडा मालक तातडीने घटनास्थळावरुन निघून गेले. ही घटना वाठार स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांना ही माहिती कळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून बेकायदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |

अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |