लखनौ : विश्वचषक २०२३ मध्ये सलग पाच सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडियाचे पुढील आव्हान सध्याच्या विश्वविजेत्या इंग्लंड संघाचे असेल. अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर २९ ऑक्टोबर रोजी होणारा हा सामना जिंकून टीम इंडियाला उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित करायचे आहे, तर दुसरीकडे संघर्ष करणाऱ्या इंग्लंडविरुद्ध हा सामना जिंकून विश्वचषकातील संधी कायम राखण्याचे लक्ष्य टीम इंडियाचे असेल. इंग्लंडचा संघ शुक्रवारी दुपारी लखनौला पोहोचेल.
मॅचविनर खेळाडूची एन्ट्री
२९ तारखेला रोजी एकाना येथे होणारा हा सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन एका वेगवान गोलंदाजाला कमी करून अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला संधी देऊ शकते. अश्विनला संधी दिली तर फलंदाजीमध्येदेखील भारताला अधिक फायदा होऊ शकतो. कारण अश्विन आठव्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि अश्विन बॅटनेही चमत्कार करू शकतो. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अश्विन हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत एक्स फॅक्टर ठरू शकतो. शार्दुल ठाकूरबद्दल बोलायचे तर, त्याला धरमशाला सामन्याप्रमाणेच बेंचवर बसावे लागेल. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्याप्रमाणे संघ व्यवस्थापन लखनौमध्ये पाच विशेषज्ञ गोलंदाजांना मैदानात उतरवू शकते.
फुटबॉल खेळून वॉर्म अप
या सामन्यासाठी बुधवारी रात्री लखनौला पोहोचलेला भारतीय संघ गुरुवारी एकना स्टेडियमवर पोहोचला. मुख्य स्टेडियममध्ये फुटबॉल खेळून खेळाडूंनी सराव सत्राला सुरुवात केली. रोहित, कोहली आणि अश्विनसारखे सिनियर खेळाडू एका संघात दिसले तर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या संघात नशीब आजमावले.
यादरम्यान वेगवान गोलंदाज बुमराह क्षेत्ररक्षण करताना दिसला. ४५ मिनिटांच्या क्षेत्ररक्षणाच्या सरावानंतर खेळाडू मैदानावर गेले. येथे फलंदाजी आणि गोलंदाजीची तयारी अंतिम टप्प्यात आली. यावेळी स्थानिक क्रिकेटपटूही नेटमध्ये सामील झाले, ज्यांनी कोहली, रोहित आणि राहुल यांना बराच वेळ फलंदाजीचा सराव करायला लावला.
विजयाची प्रतीक्षा
टीम इंडियाने आतापर्यंत एकना स्टेडियमवर दोन टी-२० आणि एक वनडे सामना खेळला आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध नेत्रदीपक विजय नोंदवले, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघाला एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून नऊ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अशा स्थितीत यजमान संघ पहिला एकदिवसीय सामना जिंकण्याच्या उद्देशाने एकना स्टेडियममध्ये उतरेल.
एकना स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या तीन विश्वचषक सामन्यांबद्दल बोलायचे तर, आतापर्यंत फलंदाजांना खूप मदत मिळाली आहे. सायंकाळी उशिरा थंडीचा जोर वाढला आहे. अशा परिस्थितीत दव पडल्यावर लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे होते, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला विजयाची अधिक शक्यता असते.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |