निळू फुले या नावाची, व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख करून द्यायची खरंतर गरज नाहीच. आजही खेड्यांमध्ये पन्नास ते नव्वदच्या दशकातील बायकांना निळू फुलेंबद्दल विचारलं तर त्या नाक मुरडतात, शिव्या देतात. प्रत्यक्ष आयुष्यात 'हिरो' असलेल्या निळूभाऊंच्या कामाची ही पावतीच.
आपल्याकडे सरसकट 'बाई वाड्यावर या' हा डायलॉग म्हणजे निळू फुले असं समीकरण लोकांनी करून टाकलंय आणि कॉमेडी शोमध्ये लोक त्याच्याशी संबंधित फालतू विनोदांवर टाळ्याही वाजवतात हे दुर्दैव आहे. आपणच आपल्या एका महान कलाकाराला किती खाली आणतोय याची त्यांना कल्पनाही नसते. बाई वाड्यावर या या डायलॉगच्या पलीकडे निळूभाऊ 99 टक्के शिल्लक राहतात आणि ते जाणून, समजून घेतले तर हा माणूस किती मोठा होता हे लक्षात येतं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या 'समता संगर' नावाच्या पुस्तकात निळूभाऊंच्या भन्नाट आठवणी सांगितल्यात. यावरुन निळूभाऊंच्या व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्या विचारांची उंची किती होती हे लक्षात येईल.
दाभोलकर यांनी लिहिलंय कि, मोठे कलाकार म्हणजे प्रत्येकाचेच ‘इगो’. नाटक असलेल्या ठिकाणी प्रत्येकालाच उत्तम दर्जाची स्वतंत्र वातानुकूलित खोली हवी असे. स्वाभाविकच खोलीवाटपात डावे-उजवे होई. दौऱ्याच्या अगदी सुरुवातीलाच ही राजी-नाराजी सुरू झाली.
याचे उत्तर काढणे माझ्या कुवतीच्या पलीकडचे होते. निळूभाऊंना हे कळले. त्यांनी एकदम अनोखा मार्ग काढला. त्यांनी सांगितले, ‘सगळ्यांत गैरसोईची खोली मला देत चला.’ त्यानंतर इतरांचे आवाज आपोआपच बंद झाले.
कोल्हापूर दौऱ्यात निळूभाऊंचे हॉटेल आणि त्यातील खोली आरक्षित असे. नाटक चालणार निळूभाऊंच्या नावावर त्यामुळं ही व्यवस्था उत्कृष्ट असणे ओघानेच आले. एके दिवशी निळूभाऊंना समजले की, आपल्या एका बॅकस्टेज वर्करचे नुकतेच लग्न झालंय आणि त्याची पत्नी त्याच्यासोबत आहे.
निळूभाऊंनी काय करावे? त्यांनी आपली खोली त्या बॅकस्टेज वर्करला दिली. हॉटेलच्या अन्य खोल्या भरलेल्या होत्या. तेव्हा स्वतःची गादी त्यांनी टेरेसवर टाकायला सांगितली. मराठी सिनेमात त्यांच्या पुढारीछापाच्या आवृत्याच निर्मात्यांनी काढल्या.
पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून निळूभाऊंनी त्याला संमती दिली. पण त्यातील पोकळपणा त्यांना पुरा माहीत होता. त्यांनी जवळपास 175 सिनेमात भूमिका केल्या. मात्र त्यातील 10-15 चित्रपट देखील त्यांनी बघितले नाहीत. हे त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळे.
100 हुन अधिक चित्रपटांतील भूमिकेत त्यांनी बलात्कार केले. 'त्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून चळवळीत येतो' असं निळूभाऊ अनेकदा गमतीने सांगायचे. एका चाहत्याच्या घरी गेल्यावर त्याच्या आईने त्यांना बघितल्यावर 'अगं बाई, या मुडद्याला कशाला घरी बोलावलं?' अशी मुक्ताफळे उधळली.
दाभोलकर सांगतात, निळूभाऊ हे डॉ. राममनोहर लोहियांचे सच्चे अनुयायी होते. त्यांनी लोहियांचा विचार वाचला, अभ्यासला आणि पचवला होता. त्यामुळे समता संगरातील साथी म्हणून त्यांनी आपली भूमिका आयुष्यभर नेकीने बजावली. राजकारणाचे व्यापक भान निळूभाऊंना होते. राजकीय डावपेच आणि सत्तेच्या सहभागातील संभाव्यता याचेही आडाखे त्यांना माहीत होते, पण तरीही जीवननिष्ठा म्हणून समतेच्या छोट्या-छोट्या चळवळींना ते हक्काचा माणूस म्हणून सतत धावत गेले. अंगमेहनती कष्टकऱ्यांचे आंदोलन, समान पाणीवाटपाची संघर्ष चळवळ, राष्ट्र सेवादलाचे कार्य, अंधश्रद्धानिर्मूलनाची धडपड यांमध्ये हातचे काहीही न राखता निळूभाऊ सहभागी झाले. खरोखर, कलाकार म्हणून निळूभाऊ ग्रेट होतेच पण माणूस म्हणून ते त्याहून महान होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |