01:56pm | Apr 25, 2024 |
सातारा : जावळी तालुक्यात कुठलाही मोठा प्रकल्प नसल्याने येथील स्थानिक शेतकरी पिढ्यानपिढ्या बोजा वाहत आहेत. माथाडी कामगारांच्या बाबतीत दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांचे मोठे योगदान आहे. आता माथाडीचे नेते म्हणणाऱ्यांनी काय काय भानगडी केल्या आहेत त्यांची सर्व अंडीपिली मलाच माहित आहेत योग्य वेळ येताच ती बाहेर काढणार आहे, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिला.
वसंतगड येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले जि.प.माजी उपाध्यक्ष श्री वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक श्री ज्ञानेश्वर रांजणे, श्री सुनील काटकर, सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, सयाजीराव शिंदे, शिवाजीराव मर्ढेकर, लक्ष्मणराव कडव, एकनाथ ओंबळे, पांडुरंग जवळ, गीताताई लोखंडे, कविता धनावडे, निर्मलाताई दुधाने, कांतीबाई देशमुख, दत्ता पवार, रवी परमणे, अंकुश शिवणकर, तानाजीराव शिर्के, विनोद वेदे, अविनाश कारंजकर, अशोक भोसले, वीरेंद्र शिंदे, संदीप परमणे, समाधान पोकळे, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, दादा पाटील, बाळासाहेब पाटील-सरपंच आनेवाडी, नाना पवार, विठ्ठल मोरे-संचालक प्रतापगड कारखाना, रामभाऊ शेलार, तुकाराम धनवडे, सागर धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मानकुमरे म्हणाले, जावळी तालुक्यातील माथाडी कामगार दिशाहिन आहेत. मी लोकसभा निवडणुकीला उभा होतो त्या वेळेला शशिकांत शिंदे यांनी माझ्या विरोधात प्रचार केला. त्यावेळी माझ्यासाठी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी बामनोली, पाचगणी येथे जाहीर सभा घेतल्या होत्या, हे मी विसरलो नाही. उदयनराजेंचा या निवडणुकीत आम्ही सर्वजण ताकदीने प्रचार करणार आहोत.
ज्ञानेश्वर रांजणे म्हणाले, नुकत्याच झालेल्या विरोधकांच्या मेळाव्याला किती लोक उपस्थित होते हे सर्वांना माहीत आहे. जावळीचे कार्य कुशल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे जावळीच्या विकासासाठी झटत आहेत. आता दहा वर्ष जावळीकडे दुर्लक्ष करणारे मते मागायला यायल लागले आहेत. विरोधी उमेदवाराचा पत्ता कोरेगाव तालुक्यात आहे. ते स्थानिक असल्याचा खोटा कळवळा आणत असून उदयनराजेंना जावळी तालुक्यातून 70 हजारापेक्षा जास्त लीड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |