सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक दिवसेंदिवस अधिकाधिक रंगतदार होत असून लक्षवेधी ठरते आहे. त्याला कारण तसेच आहे. खा. उदयनराजे भोसले आणि आ. शशिकांत शिंदे थेट एकमेंकांच्या विरोधात जोरदार तोफा डागत आहेत. माध्यमे हाय व्होल्टेज - काटे की टक्कर असे शब्दप्रयोग वापरून निवडणुकीतील ‘रंगत’ आणखीनच अधोरेखित करत आहेत. पॉलिटिकल अंदाज - विश्लेषण यावरूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत. ऐन उन्हाळा - प्रचंड उकाडा अशा वातावरणात प्रचारही कमालीचा तापवला जात आहे. गर्दीच्या सभा, जाहीर सभा, कोपरा सभा, बाईक रॅली, पदयात्रा अन् बैठका यांनीही जोर धरलाय !
सातारा लोकसभा मतदार संघात एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत खा. उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे या दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये आहे. यापैकी जो दलित - मुस्लिमांची मते स्वतःकडे वळविण्यात यशस्वी होईल, तोच उमेदवार विजयी होईल, नव्हेतर तोच सातारचा खासदार असेल ! कारण दलित - मुस्लिमांची मते ही निर्णायक मते आहेत. इथे एकूण 18 लाख 50 हजार मतदार आहेत. यापैकी सुमारे सव्वाचार लाख मते दलित अन् मुस्लिमांची आहेत. त्यामुळे ही मते by hook or crook आपल्यालाच मिळायला हवीत, यासाठीचा ‘संघर्ष’ सर्व पातळ्यांवर होताना दिसत आहे.
सातारा लोकसभा मतदार संघाच्या अनुषंगाने खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व खा. शरद पवार यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या असून राजकीय अस्तित्वासाठी महाविकास आघाडी आणि महायुती निकराचा प्रयत्न करत आहे. या उमेदवाराचे पारडे जड, त्या उमेदवाराची प्रचारात मुसंडी असे माध्यमांद्वारे सातत्याने सांगितले जात असले तरी इथला ग्राऊंड रिपोर्ट काय सूचित करतो ? शिवाय इथला स्थानिक सांस्कृतिक - सामाजिक प्रवास काय दर्शवतो, यावरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरून इथला ओबीसी असुरक्षिततेच्या गर्तेत अडकलाय. पुसेसावळीत मुस्लिम युवकाचा झालेला खून अन् उसळलेली दंगल इथला मुस्लिम समाज बांधव विसरलेला नाही. सातत्याने दलित समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारामुळे दलित बांधवही अस्वस्थ आहे. इथली पॉलिटिकल यंत्रणा, प्रशासन यंत्रणा सन्मानाची वागणूक देत नसल्याची भावना दलित समाजात खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे यावेळी जे दलित बांधव मताधिकार बजावतील, त्यांची मते ही thoughtfully मते असणार आहेत.
खा. उदयनराजे भोसले आणि आ. शशिकांत शिंदे हे दोन्ही तुल्यबळ उमेदवार प्रचारयंत्रणा प्रभावीपणे राबवत आहेत. माध्यमातून त्यांच्या प्रचाराची ‘खबरबात’ सर्वत्र पोहचत आहे. परंतु इतरही उमेदवार त्यांच्या त्यांच्या परीने प्रचारयंत्रणा राबवताहेत. बहुजन समाज पार्टीकडून आनंद थोरवडे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत कदम, रिपाइं गवई गट पुरस्कृत संजय गाडे, बहुजन मुक्ती पार्टीकडून तुषार मोतलिंग यांच्यासह अन्य उमेदवारही निकराचा लढा देताहेत. तेही वस्त्या वस्त्यामध्ये - घराघरामध्ये पोहचण्याचा प्रयत्न करताहेत. ते दलित - मुस्लिमांच्या सव्वाचार लाख मतांमधील किती मते घेताहेत, ओबीसींची किती मते मिळवताहेत, हेही पहायला हवे. कारण ते जेवढी मते घेतील तेवढे नुकसान शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांना सोसावे लागणार आहे. एकंदर काय, तर ज्यांना विजयश्री खेचून आणावयाची आहे त्यांना दलित मुस्लिमांच्या मतांशिवाय पर्याय नाही. 18 लाख 50 हजार मतांपैकी जेवढी निव्वळ मराठा मते आहेत ती उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांना फिप्टी फिप्टी मिळाली तर पारडे जड करण्याचे काम हे दलित-मुस्लिमांच्याच मतांना करावे लागणार आहे. नव्हेतर ही जबाबदारी ती मते चोखपणे पार पाडतील. थोडक्यात सातारचा खासदार कोण, हे दलित मुस्लिम मतेच ठरवतील..!
- अरुण विश्वंभर जावळे
98 22 41 54 72
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |