सातारा : भाजप कामगार मोर्चाची कामगार नोंदणी 20 हजाराहून अधिक आहे. मोर्चाचा उद्देश केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने दिलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे हा आहे, आणि आम्ही त्या पोचवल्या आहेत. सहाजिकच एका कामगाराचे चार जनांचे कुटुंब असा हिशोब धरला तर एक लाखावर मतदान भाजपा कामगार मोर्चाचे आहे. हे सर्व मतदान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी असेल अशी ग्वाही भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे यांनी सातारा येथे झालेल्या कामगार मेळाव्यात दिली.
याप्रसंगी सातारा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.
हरगुडे पुढे म्हणाले, भाजपा कामगार मोर्चा औद्योगिक कामगार, शेतमजूर, घरेलू तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या अडीअडचणी आम्ही समजावून घेत आहोत. सहाजिकच 18 वर्ष वयाच्या कामगारापासून महिला व जेष्ठ कामगारांपर्यंतचे प्रश्न आम्ही मार्गी लावत आहोत. या कामी आम्हास पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, मदनदादा भोसले, अतुलबाबा भोसले, धैर्यशील कदम, विक्रमबाबा पाटणकर, मनोजदादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे.
याप्रसंगी वनिता सुर्वे, नंदा चोरगे, मुमताज सय्यद यांनी भाजप कामगार मोर्चात प्रवेश केला. मेळाव्यास मोर्चाचे उपाध्यक्ष भाई गावडे, तेजस जमदाडे, चित्रपट आघाडी संयोजक विकास बनकर आदींनी मार्गदर्शन केले.
यावेळी अलीभाई आगा, मीनाक्षी पोळ, आशाताई जाधव, शिवदास लोहार, कुलदीप पवार, साताऱ्याच्या माजी नगराध्यक्ष रंजना रावत, श्रीकांत कुंभार, सुभाष गोगावले, विशाल शेडगे, विशाल घेवडे, सचिन काटे, विश्वनाथ कांबळे, संदीप ननावरे, सर्जेराव कोरके उपस्थित होते.
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |

महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |