सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी कमी झाल्याने कोयना धरणातील विसर्ग घटला आहे. सध्या ३१०० क्यूसेक पाणीसांगलीसाठी धरणातून सोडले जात आहे. हे पाणी कोयना नदीपात्रातून पुढे जात आहे. तर धरणात सध्या ४२ टीएमसी पाणीसाठा आहे.
राज्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले. त्यामुळे दुष्काळाचे सावट सर्वत्र आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील कमी पाऊस पडला होता. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही अपुरे पर्जन्यमान होते. परिणामी कोयना धरण भरलेच नव्हते. धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीपर्यंतच पोहोचलेला. पण, याच कोयना धरणावर सातारा, सांगली, आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचन योजना अवलंबून आहेत. तसेच काही गावांची तहानही धरणातील पाण्यावरच भागते. तर धरणातील पाण्याची सर्वाधिक तरतूद ही सांगली जिल्ह्यासाठी आहे. यावर सांगलीतील प्रमुख तीन सिंचन योजना अवलंबून आहेत.
गेल्यावर्षी अपुरा पाऊस झाल्याने सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील सिंचनासाठी वारंवार पाणी सोडण्यात येत आहे. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून हे पाणी मागणीनुसार सोडले जाते. त्यातच मागील आठवड्यातच सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे कोयना धरणाचे विमोचक द्वारमधील विसर्ग वाढविण्यात आला होता. सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी एकूण ३३०० क्यूसेक पाणी सोडण्यात येत होते. मात्र, गुरुवारी सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी कमी झाली आहे. त्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला आहे.
गुरूवारी दुपारपासून सांगली जिल्ह्यासाठी एकूण ३१०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विमोचक द्वारमधील विसर्ग १२०० वरुन १ हजार क्येसक करण्यात आलेला आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरूच आहेत. त्यामूधन २१०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. हे सर्व पाणी कोयना नदीपात्रातून पुढे जात आहे.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |