सातारा : माझ्या बायकोशी दारू पिऊन का बोलतोस, असे म्हणाल्याच्या कारणावरून विजय हरी भोसले (रा. देगाव, ता. सातारा) यांच्या पोटात चाकू भोसकून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ३ रे एन. एच. जाधव यांनी एका कापड दुकानदाराला तीन वर्षे साधी कैद तसेच २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
लक्ष्मण धनंजय पाटील (वय ३८, रा. कारंडवाडी, ता. सातारा), असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या कापड दुकानदाराचे नाव आहे. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, कारंडवाडी, ता. सातारा येथे ११ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विजय भोसले यांनी आरोपी लक्ष्मण पाटील याला जाब विचारला. ‘तू दारू पिऊन माझ्या बायकोशी का बोलतोस’ असे म्हणताच लक्ष्मण पाटील याने त्याच्या जवळील चाकूने विजय भोसले यांच्या पोटात चाकूने भोसकले. यात भोसले जखमी झाले. सातारा तालुका पोलिस ठाण्यात लक्ष्मण पाटील याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक ए. एस. चौधरी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी लक्ष्मण पाटील याला तीन महिने साधी कैद व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दंडाची रक्कम जखमी विजय भोसले यांना देण्यात यावी, असा आदेश देण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता फेरोज शेख यांनी खटल्याचे काम पाहिले. पोलिस प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक सुनील सावंत, सहायक पोलिस फौजदार शशिकांत गोळे, हवालदार गजनान फरांदे, महिला पोलिस हवालदार रहिनाबी शेख, पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र कुंभार, अमित भरते यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |