अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
महाराष्ट्रातील आराध्य दैवत असणाऱ्या पंढरीच्या विठुरायाचे गुणगान करणाऱ्या या ओळी पांडुरंगाच्या रंगात रंगवून टाकतात.. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही २१ व्या शतकात ही तितक्याच ताकदीने आणि तितक्याच दृढ विश्वासाने सुरू आहे. मुळातच आषाढ महिना सुरू झाला की वेध लागतात ते आषाढी वारीचे, पांडुरंगाच्या दर्शनाचे. विठ्ठलाचे ते सावळे, सुंदर, लोभस रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी सारे भक्त आसुसलेले असतात.
भेटी लागी जीवा
लागली समाधी
अशी आर्त साद जणू सारे भक्त विठ्ठलाला घालत असतात.
पंढरीची वारी आणि पंढरपूरच्या दिशेने जाणारे वाऱ्यांचे, दिंड्यांचे ताफेच्या ताफे, लहान थोर, अबाल वृद्ध यांचे वारीतील तल्लीन होवून नाचणे, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन काही क्षणापुरता का होईना संसाराचा विसर पडून देहभान हरपून वारीत सहभागी होणाऱ्या माता भगिनी पहिल्या की विठू माऊलीच्या आभाळाएवढ्या थोरवीची कल्पना आल्याशिवाय रहात नाही.
टाळ मृदुंगाचा गजर, कोणत्याही प्रकारचा डामडौल, दिखावा न करता अतिशय शिस्तबद्ध रीतीने चाललेल्या दिंड्या,आजूबाजूचे वातावरण भक्तिमय करून टाकतात. अवघ्या जगाला समतेचा संदेश देणारी, लहानथोर, अबाल वृद्ध, श्रीमंत गरीब, श्रेष्ठ कनिष्ठ असा कोणताच भेदभाव न करता वारीतील प्रत्येकाच्या रुपात माऊलीचं दर्शन देणारी ही वारी आपल्याही नकळत आपल्याला विचारांच्या उंचीवर नेऊन ठेवते.
ना कोणताच स्वार्थ, ना कोणत्या फायद्याचा विचार तरीही तल्लीन होऊन, देहभान हरपून वारीत सहभागी होणारे वारकरी पाहिले की आपण महाराष्ट्रात जन्मल्याचा अभिमान वाटू लागतो.
महाराष्ट्र संतांची, महंतांची, पुण्यवंतांची भूमी तर आहेच पण त्याहीपेक्षा आपल्या असीम अशा श्रद्धेने २१ व्या शतकातही अध्यात्म, परमार्थ, श्रध्दा, विश्वास जपणाऱ्या तमाम महाराष्ट्रवासियांची आणि वारकऱ्यांची भूमी आहे. संस्कार नुसते शिकवून चालत नाही तर ते अंतःकरणात खोलवर रुजवावे लागतात आणि संस्कारांच हेच रूजणं या वारीच्या रूपानं आजही आपल्या महाराष्ट्रात अस्तित्वात आहे.
वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वरांचे वडील वारीला जात होते असे सांगितले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती त्यामुळे लोक समूहाने चालत पंढरपूरला जात. तीच प्रथा आजही चालू आहे. हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यांमधे सुसूत्रता आणली. ते ज्ञानेश्वरांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जात होते. पुढे त्यांचे चिरंजीव नारायण महाराजांनी श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली.
आषाढी वारी म्हणजे पंढरपुरात येणारा भक्तीचा महापूर असे म्हणले जाते. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातून पंढरपुरात दाखल होतात. देव आणि भक्ताच्या भेटीचा अलौकिक सोहळा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतो.
जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल अशा नामघोषाने पंढरपूर नगरी दुमदुमत असते.
खरंतर वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. वारी म्हणजे नुसती भगवदभक्ती नाही तर देव आणि भक्त यांच्यातील अटळ नाते, अढळ विश्वास आणि देव भक्त भेटीमधील आत्मनंदाचा तो साक्षात्कार आहे. विठुरायाला भेटल्यावर जे चैतन्य प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतं तेच चैतन्य भक्ताला भेटणाऱ्या विठुरायाच्या मूर्तीवर ही आषाढी एकादशीच्या दिवशी झळकत. लेकाराच्या ओढीने झपाट्याने घराकडे परतणारी माऊली लेकराची भेट झाल्यावर जितकी तृप्त होते तीच तृप्ती पांडुरंगाच्या चेहऱ्यावर आषाढीच्या दिवशी पाहायला मिळते.
विठ्ठलाच्या गावी जावे
अन् विठ्ठलरूप व्हावे.
याप्रमाणे वारीला जाणाऱ्या प्रत्येकालाच वारीतील प्रत्येकाच्या रुपात विठ्ठलरूप दिसते. विठुरायाला माऊली मानणाऱ्या प्रत्येकाच्या मनात विठ्ठल माऊलीच्या रूपानेच विराजमान होतो. वारीची वाट संतांनी दाखवली आणि याच वाटेवरून चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सदाचारी बनवले.
विवेकाच्या दिशेने होणारी वाटचाल म्हणजे वारी. अनादी काळापासून मानवी जीवनात अनेक स्थित्यंतरे घडली, कितीतरी बदल आले अन् गेले पण ही पंढरीची वारी आजही २१ व्या शतकातही तितक्याच ताकदीने,निष्ठेने चालू आहे याचे खरे कारण काय असेल तर द्वैत अन् अद्वैत, देव अन् भक्त यांचा अदृश्य संवाद. हा गुरु शिष्य संवाद च वारीच्या यशाचं गमक आहे.
विठ्ठल नामाचा महिमा काय आहे हे जो ते नाम तितक्याच ताकदीने घेतो त्यालाच अनुभवायला मिळतो. ज्ञानरूपी परमात्मा आणि भक्तरुपी वारकरी यांच्यातील हा संवाद ज्यांना खरच अनुभवायचा असेल त्यांनी आयुष्यात एकदा तरी वारी नक्की करावी.
पंढरीची ओढ लागावी
अवघी काया विठ्ठल व्हावी.
याप्रमाणे विठ्ठल दर्शनाच्या ओढीने जीव शिव एक होतात अन् उरते ते फक्त विठ्ठल नाम. या नामाचा महिमा, विठ्ठल दर्शनाची गोडी अनुभवण्यासाठी एकदा तरी वारी करावी अन् प्रत्येकाची वारी घडावी. समता, बंधुता, परोपकार, अहिंसा,न्यायप्रियता अशी शिकवण संतांनी दिली त्या शिकवणुकी नुसार आचरण व्हावे अन्
"अवघे जग पंढरपूर व्हावे"
अशी आस ठेवणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या रूपातील माऊलीला दंडवत. भक्तीचा मळा फुलवणारी, समतेचा ध्वज आणखी उंच फडकवू पाहणारी, सद्विचार, संस्कार, मूल्ये, शिस्त, ऐक्य अशा अनेक पातळ्यांवर यशस्वी झालेली ही पंढरीची वारी अनादी अनंतापर्यंत अशीच चालू राहावी. वर्षातील प्रत्येक दिवस आषाढी एकादशी अनुभवता यावी आणि प्रत्येक मानवाच्या रुपात प्रत्येकाला माऊलीच दिसावी हीच या वारीच्या निमित्ताने पांडुरंगाला मागणी.
"मागणे हेच माझे
विठ्ठलरूप सारे जग हे व्हावे.
नाम ओठी यावे सदा
पंढरीच्या वाटेवर
देव भक्त संगम व्हावा.
संकलन - सौ. आराधना गुरव, वडूज.
शब्दांकन = प्रकाश राजेघाटगे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |