पुस्तक परीक्षण...
चैत्र वैशाख: निसर्गाचा मुक्त आविष्कार
-प्रा.नंदकुमार शेडगे
‘चैत्र वैशाख’ हा ललित लेखसंग्रह प्राध्यापक युवराज खरात यांचा आहे. प्रा.युवराज खरात यांनी यापूर्वी मराठी साहित्याच्या प्रांतात सकस असे लेखन केलेले आहे. त्यामध्ये त्यांचा ‘उमेद’ हा पहिलाच काव्यसंग्रह अमेरिकेत प्रकाशित झाल्यानंतर साहित्यिक प्रांतात त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यानंतर त्यांच्या ‘राव’ आणि ‘रावपण’ या कादंबर्या प्रकाशित झाल्या. अल्पावधीतच या कादंबर्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या. यामुळे खरात यांच्या लेखणीस चांगली प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतूनच त्यांची लेखणी अधिकाधिक समृद्ध होऊ लागली. त्यानंतर त्यांनी कथा लेखनही केले. त्यांचा ‘गहिवरलेले आभाळ’ कथासंग्रह प्रकाशित झाला. तोही कथासंग्रह लक्षवेधी ठरला. आत्ताच नव्याने प्रकाशित झालेला ‘चैत्र-वैशाख’ हा ललित लेख संग्रह (2021) स्नेह विश्व प्रकाशन सातारा यांनी प्रकाशित केला.
या ललित संग्रहात एकूण 15 लेख आहेत. प्रत्येक लेखातून निसर्गाच्या बदलत्या रूपाचे चित्रण केले आहे. पहिल्या लेखामध्येच ‘आनंदाच येणे’ मधून माणसाच्या जीवनात आनंद कसा येतो? तो किती क्षणिक असतो? याचं चित्रण केलेल आहे. तसं पाहिलं तर आयुष्य हे क्षणभंगुर आहे. अशा या क्षणभंगूर आयुष्यामध्ये ‘सुख पाहता जवा एवढे दुःख पाहता पर्वताएवढे’ या सुभाशिताप्रमाणे माणसाचं आयुष्य आहे. आनंदाचं मूल्य या लेखातून चित्रित झालेले आहे. काही लेखांमध्ये लेखकाने कवितेचा सुंदर वापर केलेला आहे. कविता वाचकाच्या मनाला भुरळ घालते. कविता वाचत असताना वाचक वेगळ्या विश्वामध्ये जातो. त्याचबरोबर आशयाला घनता प्राप्त होते आणि वाचक क्षणभर का होईना मनोमन सुखावतो. हिंदी, मराठी सुंदर गीतांचा सुरेख संगम लेखकाने लेखामध्ये साधलेला आहे. त्यातून वाचकाला आनंद मिळतोच त्याहीपेक्षा वाचकाचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण हा अत्यंत आशावादी होतो. हे प्रत्येक लेख वाचल्यानंतर कळते ‘चैत्र वैशाख’ मधून निसर्गाचा अविष्कार पाहावयास मिळतो. तो पावसाच्या स्वरूपामध्ये अधिकतेने लेखकाने रेखाटलेला आहे. लेखकाने अनुभवलेली पावसाची रूपं अधिकाअधिक वाचकांच्या मनाला अंतर्मुख करून सोडतात. लेखक ‘नभ दाटून आले ’या लेखात पाऊस पाणी नसल्यामुळे माणसांची पाण्यासाठीची वणवण मांडताना लेखक म्हणतात, ‘उन्हाळा जाणवायला लागला की, त्यांच्या गरम झळा माणसाला दोन भांडी पाण्यासाठी रक्त जाळावं लागतं.’ प्यायला पाणी मिळावं म्हणून रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करणारी परिस्थिती आपल्याकडे आहे निसर्गाचं बदलते स्वरूप आणि अनिश्चितता यामुळे मानवाची होणारी परवड वाचकांना हळवे करून सोडते त्याचबरोबर हाच पाऊस मुसळधार झाल्यानंतर माणसाची होणारी वाताहत लेखकांनी स्वतः जवळून अनुभवलेली आहे, ते म्हणतात. या निसर्गाच्या प्रकोपाने डोंगराकडेची गावं असल्या पावसाळी रात्रीत अंधारातच असतात. डोंगरमाथ्यावरील पाण्याचा वेगवान प्रवाह ध्यानीमनी नसताना दरड घेऊन येतो आणि उद्याच्या स्वप्नांचा चुराडा करून टाकतो. या ओळीतून निसर्गाचा प्रकोप वाचकांच्या डोळ्यासमोर उभा राहिल्या वाचून राहत नाही. हा निसर्गाचा आविष्कार माणसाला क्षणात सुख आणि क्षणात दुःख देऊन जातो. माणसाच्या वाट्याला येणारे दुःख सहन करण्याची ताकद हा निसर्ग देत असतो आणि जगण्याची प्रेरणा पण तोच देत असतो. ते सांगत असताना लेखक म्हणतात, उद्याच्या काळात आणखी कष्ट करणार्या हातावर विश्वास ठेवून आयुष्य जगत राहायचं. पुन्हा ऊन,वारा,पाऊस आणि कडाडणार्या विजा सोबत घेऊन तर कधी काळोखातही वेगानं ढगफुटी झालेल्या कोसळधारांसमवेत. या ओळीतून वाचकांच्या काळजाला पीळ पडल्यावाचून राहत नाही. लेखकाने वापरलेली भाषा ही अत्यंत हृदयस्पर्शी आहे. माणसाच्या अंतःकरणाला भिडणारी आहे. म्हणूनच वाचकांची रसवता अधिकाधिक वाढते.
लेखकांनी अनुभवलेला पाऊस रेखाटताना ते बोलून जातात. मी बघत होतो वडील गुडघाभर पाण्यात उभे होते. हाता तोंडाला आलेली पीक चिखलात आणि गढूळ पाण्यात खोलवर रुतून बसलेली जणू पोटाच्या घासाला नागाचा दंश झाला आहे. सालभर कष्ट करून सुद्धा दोन वेळचे अन्न पुरेसे मिळत नाही. हा निसर्गाचा चमत्कार असतो. निसर्गामध्ये घडणारे बदल याचा मानवी जीवनावर होणारा चांगला वाईट परिणाम त्यातून माणसाची उमेद खचून जाते अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाऊन माणूस आज जीवन जगण्यासाठी प्रयत्न करीत असतो. अनेक संकटांना सामोरे जाऊन उभा राहण्याची ताकद हा निसर्ग देत असतो आणि त्याच निसर्गाच्या साक्षीने मनुष्यप्राणी उभा राहत असतो. प्रत्येक सजीव सृष्टीतील प्रत्येक सजीवाला काहीना काहीतरी सोसावं लागतं. कभी खुशी कभी गम, कधी तळपते ऊन तर कधी घनदाट सावली ही माणसाच्या आयुष्यामध्ये येतच असते. सुख दुःखांचा पाठशिवणीचा खेळ करत मनुष्य जीवन जगत असतो. एकूण काय तर माणसाच्या आयुष्यात ‘आनंदाचे येणे’, ‘चैत्रपालवी’, ‘वैशाख वणवा’, ‘चैत्र वैशाख’, ‘पाऊस रिमझिम’, मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट या सर्वांच्या आठवणी कायम सोबत घेऊन माणूस जगत असतो.हेच लेखकांनी सूचित केलेले आहे आणि म्हणूनच चैत्र वैशाख निसर्गाचा मुक्त आविष्कार आहे. हे वाचकाला मनोमन पटते आहे. ‘आठवण’ या लेखामध्ये आपल्या आयुष्यातील अनुभवांचं गाठोडं वाचकांपुढे मांडताना त्यातील एक एक आठवण सांगताना लेखक म्हणतात, ‘मानवी नातेसंबंधात काही वळणावरच्या आठवणींना कायमस्वरूपी देहात जिथे जागा मिळेल तिथे लपून ठेवाव्यात’ कारण तो मोर पिसार्यातील अनोख्या रंगासारखा प्रत्येकाला आयुष्याच्या कुठल्याही वळणावर सुखद अनुभव देत असतो कारण आठवणीसहीत अनुभव आपले असतात. हे वाचताना वाचक अंतर्मुख होतो आणि वाचक अधिकाधिक आठवणीत गुंतून जातो. अशा या अनेक आठवणी या ललित संग्रहातून सागितल्या आहेत. लेखक या ललित गद्य पावसाची अनेक रूपे व्यक्त करतात. वादळी पाऊस आणि गावाकडच्या जिवांना जगवणारा उपयुक्त पाऊस, नभ दाटून आलेला पाऊस आणि आठवणीतील भावस्पर्शी आत्ममग्न पाऊस ठायी ठायी व्यक्त होतो. पाऊस आल्यानंतरचे निसर्गाचे नयनरम्य रूप मानवी मनात रुंजी घालते. त्यातून वाचकांच्या मनो विश्वात चैत्रपालवी फूटू लागते. हेच या ललित संग्रहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते. या लेखसंग्रहाततील ‘चांदणे’ हा निसर्गाचा आविष्कार काही लेखातून आलेला आहे. उन्हात शीतल चांदणे पडणे, मंद झालेल्या तारकांची आठवण करून देणारा मदन आणि चांगला सुगंधाची अनुभूती आणून देणारा आत्मसंवाद शब्द साक्षात्कार या लेखांना एक वेगळीच उंची प्राप्त करून देतो. या व्यतिरिक्त चैत्र पालवी चैत्र वैशाख निसर्गातील मानवाचे मुक्तपणे आनंदी वावरणे आणि निसर्गाच्या अनेक आठवणीत जीवनाला समजून घेणे. या सर्व गोष्टी लेखक कौशल्याने शब्दरूपात मांडतात.
या ललित लेखात अनेक ठिकाणी कवितेच्या समयोचित ओळींची निवड लेखकाने केलेली आहे. त्याचबरोबर कोकिळा, गुलमोहर पक्षांचा चिवचिवाट, सोनचाफा, पहाटेचा पाऊस, महाप्रलय, कोरोना विषाणूची धास्ती, क्षणभंगुर जीवनाची आठवण आणि जीवनातील भावविश्व यामुळे खरात यांच्या ललित लेखांची उंची वाढते. या लेखनातून खरात यांचा निसर्गाकडे बघण्याचा सकस दृष्टीकोण दिसून येतो. त्यांची समृद्ध भाषाशैली, चिंतनशीलता, व्यासंगी व्यक्तिमत्व, उत्तम निरीक्षण क्षमता, वर्णनाला साजेशी शब्दांची निवड, निसर्गावरील प्रेम या सर्वांचा प्रत्यय वाचकांना येतो. सोनसळी स्पर्शाने काळजात घर करणारा पाऊस वैशाख वणवा संपवणारा गर्जत आलेला पाऊस आणि आठवणीतला पाऊस अशी अनेक पावसाची रूपं टिपली आहेत. चैत्र-वैशाख लेख संग्रहाची भाषा ही लेखकाने चित्रदर्शी स्वरूपात साकारली आहे. प्रा.खरात यांनी चैत्र-वैशाखमधून निसर्गाचे सर्वांगसुंदर वर्णन करणारे शब्दशिल्प साकारले आहे. सरतेशवेटी काय तर... चैत्र-वैशाख म्हणजे निसर्गाचा मुक्त आविष्कार ‘चैत्र-वैशाख’ लेख संग्रहाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे. मुखपृष्ठावरील नाजूक कोमल रंगीबिरंगी पान मनाला चैतन्य रुपी पालवी देऊन जातात. त्याचबरोबर लेख संग्रहाची उंची वाढवून जातात. मलपृष्ठावर ती लेखकाला दिलेले आशीर्वादरुपी शब्द लेखकाची प्रेरणास्थाने आहेत. त्यामुळे लेखकाचा साहित्यिक व्यासंग अधिकाधिक समृद्ध होणार आहे. त्यांच्या हातून अनेक सकस कलाकृती निर्माण होतील, यात तिळमात्र शंका नाही. या पुस्तकासाठी डॉ. सयाजी राजे मोकाशे यांनी दिलेली प्रस्तावना हे लेखकाची प्रेरणास्त्रोत आहेत. याच प्रेरणेतून लेखक साहित्य शारदेच्या मंदिरात पणती बनून शेवटच्या श्वासापर्यंत साहित्यरुपी सेवा करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रा. युवराज खरात यांना पुढील निरामय जीवनास आणि साहित्यिक वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा !
- प्रा.नंदकुमार शेडगे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |