05:04pm | Apr 12, 2019 |
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार असलेले श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ 17 एप्रिल रोजी होणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेकडे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सातारच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार, याबाबतही लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
उदयनराजे आणि राज ठाकरे हे दोन्हीही पुढारी ट्रेंडिंगमधील आहेत. उदयनराजे व राज ठाकरे यांच्यासंबंधीची कोणतीही बातमी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर ती गुगल ट्रेंडिंगमध्ये येते. लाखो वाचक एका क्षणात त्यांची बातमी वाचतात. त्यामुळे उदयनराजे व राज ठाकरे यांची लोकप्रियता लक्षात येवू शकते. उदयनराजे सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमधून उभे आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपला बिनशर्त पाठिंबा महाआघाडीला दिलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत महायुतीवर व पर्यायाने नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागायला सुरुवात केली आहे. 17 एप्रिल रोजी सातार्यातील गांधी मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता राज यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उदयनराजे व राज ठाकरे हे प्रथमच एका व्यासपीठावर येत असल्यामुळे सातारा तसेच महाराष्ट्रातील लोकांचे लक्ष या सभेकडे लागलेले आहे. उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांनी प्रचाराची भिरकीट लावली आहे. वाई, पाटण, जावली सारख्या दुर्गम भागात ते प्रचारासाठी फिरत आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाचे मतदान 23 एप्रिल रोजी होत आहे. असे असताना राज ठाकरे यांची सातार्यात सभा निश्चितच वादळी ठरणार आहे. राज ठाकरे आपल्या नेहमीच्या शैलीत महायुतीवर तोफ डागणार आणि उदयनराजे ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी’, असे म्हणत कॉलर उडवणार, त्यामुळे 17 तारखेला सातार्यात होणार्या सभेला तोबा गर्दी होणार, एवढे मात्र निश्चित.
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |

अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |