सातारा, : करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु असताना विनापरवाना तळेगाव दाभाडे(पुणे) येथून बुध, ता. खटाव येथे आल्याने इक्बाल कादर शेख व त्याच्या पत्नीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत पुसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर संशयित गावगुंड आमिर शमशुद्दीन शेख व त्याचा भाऊ जहांगीर शमशुद्दीन शेख यांच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, बुध, ता. खटाव येथील शेख यांच्याकडे कादर हा त्याच्या पत्नीसह राहण्यास आला होता. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याची बातमी राजेघाटगे यांनी केली होती. त्याचा राग मनात धरून गावगुंड शेख या भावांनी राजेघाटगे यांच्या घरात घुसून दि. २४ रोजी बातमी छापल्याचा जाब विचारात लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर या गावगुंडांनी राजेघाटगे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.
मारहाणीचा जिल्ह्यातील पत्रकारांकडून निषेध
या घटनेची माहिती मिळताच खटाव तालुक्यातील पत्रकारांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत, घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघासह जिल्ह्यातील पत्रकारांनी राजेघाटगे यांना मानसिक आधार दिला. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना घटनेची माहिती देत, कडक कारवाई करण्याची मागणी केली. राजेघाटगे यांना झालेल्या मारहाणीचा जिल्ह्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |