सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे गावच्या हद्दीत दोन युवकांनी एसटी चालकाला पट्ट्याने बेदम मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केल्यानंतर ही घटना पाहून प्रवाशांचाही थरकाप उडाला. फ्री स्टाईलने झालेल्या या राड्यामुळे वाहतुकही काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, संशयित दोन युवकांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शेंद्रे गावच्या हद्दीत महामार्गावर एसटी व दुचाकी यांच्यामध्ये साईट देण्यावरुन जुगलबंदी सुरु झाली. याचा राग मनात धरुन दुचाकीवरील दोन युवकांनी एसटी थांबवली. यातील दोन्ही युवकांनी एसटी चालकाला थेट केबिनमधून खाली ओढण्याचा प्रयत्न केला. एसटी चालकाने प्रतिकार करताच त्यातील एका युवकाने पट्टा काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. भरदुपारी महामार्गावर हाणामारीचा प्रकार सुरु झाल्यानंतर एसटीमधील प्रवासी घाबरले. परिसरातील काही जणांनी दोन्ही युवकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र युवक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. हा सर्व प्रकार एसटीतील एका प्रवासाने मोबाईलमध्ये चित्रीकरण केला.
या घटनेची माहिती जिल्हा वाहतुक पोलिसांना समजल्यानंतर जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस हवालदार जयवंत भोकरे व देवानंद बर्गे यांनी त्यांनी घटनास्थळ धाव घेतली. पोलिसांनी यावेळी प्रवाशांची चर्चा करुन नेमकी चूक कोणाची आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. सुमारे एक तास हा गोंधळ सुरु होता. महामार्गावरील या घटनेने परिसरातील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी एसटी चालकाची व युवकांची बाजू ऐकल्यानंतर त्यांना सातारा तालुका पोलिस ठाण्यात नेले.
संजय राजाराम साळुंखे व सुजीत सुनील शिवदास (दोघे रा.बोरगाव ता.सातारा) अशी मारहाण करणारांची नावे समोर आली. एसटी चालकाने तक्रार असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यानुसार दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयितांना अटक केली. मंगळवारी त्यांना सातारा न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फौजदार एस.बी.जाधव पुढील तपास करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |