02:42pm | Nov 30, 2018 |
कराड : येथील यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने कराड दक्षिण व कराड उत्तरमधील सहा शेतकर्यांना बुधवारी यशवंतराव चव्हाण कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांकाचा रोख 51 हजार रूपयांचा पुरस्कार कराड दक्षिणमधून वडगाव हवेलीच्या जयवंत जगन्नाथ जगताप यांना तर कराड उत्तरमधून पार्ले येथील राहुल अशोकराव पाटील यांना माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाने कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर होते. जि.प. सदस्य ऍड. उदयसिंह पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक दादासाहेब गोडसे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रविण पवार, जिल्हा कृषी अधिक्षक सुनिल बोरकर, कृषी विकास अधिकारी विनायक पवार, उपसंचालक रविंद्र ढमाळ, डॉ. अंकुश परिहार, संपतराव शेवाळे, जगन्नाथ मोहिते, संपतराव इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कराड दक्षिणमधून द्वितीय क्रमांकाचा रोख 31 हजार रूपयांचा पुरस्कार मनव येथील शहाजी राजाराम शेवाळे यांना तर तृतीय क्रमांकाचा रोख 21 हजार रूपयांचा पुरस्कार बामणवाडीच्या कृष्णत शामराव पाटील यांना प्रदान करण्यात आला. कराड उत्तरमधून द्वितीय क्रमांकाचा 31 हजार रूपयांचा पुरस्कार रिसवड येथील वैभव संपतराव इंगवले यांना तर 21 हजार तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अंधारवाडीच्या पांडूरंग जयसिंग सावंत यांना प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी प्रभाकर देशमुख, जगन्नाथ मोहिते, वसंतराव जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. बाजार समितीचे सभापती मोहनराव माने यांनी प्रास्ताविक केले. ऍड. उदयसिंह पाटील यांनी स्वागत तर संचालक महादेव देसाई यांनी आभार मानले.
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |

अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |