सातारा : शहर पोलिस ठाणे व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातारा उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने सोमवारी मंगळवारी दुपारी तब्बल चार जुगार-मटका अड्ड्यावर छापे टाकून 2 लाख 9 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज अभय भिसे (वय 25, रा.पिलेश्वरीनगर), उत्तम दत्तु इंदलकर (वय 55, रा.केसरकर पेठ), प्रवीण वसंत कोरे (वय 35, रा.दौलतनगर), नितीन बजरंग बारटक्के (वय 40, रा.शाहूपुरी), सागर संभाजी धोत्रे (वय 26, रा.हामदाबाज ता.सातारा), सुनील सिताराम कदम (वय 40, रा.मेढा), वैभव रमेश पवार (वय 19, रा.धावडशी), सतीश मनोहर काळे (वय 40, सारखळ), वाजीद (कारवाईवेळी पळून गेला आहे), अनिकेत सतीश चोरगे (वय 22, रा.रविवार पेठ), अनिल रामचंद्र कोळी (वय 58, रा.आकाशवाणी झोपडपट्टी), विकास तानाजी घोगरे (वय 36, रा.रविवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहर व शाहूपुरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जुगार, मटकाचे अड्डे सुरु असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक समीर शेख यांना समजली. त्यांनी पोलिसांचे एक पथक तयार करुन मंगळवारी दुपारनंतर छापासत्र टाकले. महानुभव मठाशेजारी, शाहू स्टेडियम परिसर, कोडोली व हॉटेल आकार शेजारी मंडई परिसरात कारवाई केल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर परिसरात बघ्यांची गर्दी उसळली होती. सर्व कारवाई झाल्यानंतर त्या त्या पोलिस ठाण्याच्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.
महानुभव मठाशेजारी 64 हजार, शाहू स्टेडियम परिसरात 1 लाख 35 हजार, कोडोली येथे 4 हजार 300 रुपये तर हॉटेल आकार शेजारी 6 हजार रुपयांचा मुद्देमाल असा एकूण 2 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यामध्ये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, दुचाकी व मोबाईल यांचा समावेश आहेे.
मंगळवारी झालेल्या या कारवाईमुळे सातारा शहरात मटका, जुगाराचे धंदे सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांनी अशाचप्रकारे कारवाई सातत्याने करावीत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासोबत पोलिस हवालदार बालम मुल्ला, अंकुश यादव, धिरज भोसले, खंदारे, बनकर या पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |