12:13am | Oct 28, 2018 |
महाबळेश्वर : सहलीसाठी येथे आलेल्या पर्यटकांचे ओखळपत्र घेतल्याशिवाय कोणालाही हॉटेलमध्ये राहण्यासाठी परवाणगी देवू नये. असे स्पष्ट निर्देश मागील आठवडयात जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सर्व हॉटेल लॉज चालकांना दिले होते. परंतू लिंगमळा धबधब्यावरून आत्महत्या करणारे प्रेमी युगल ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तेथील हॉटेल व्यवसायिकांने हॉटेलमध्ये प्रवेश देताना केवळ पुरूषाचेच ओखळपत्र घेतले होते. त्यामुळे आत्महत्या केलेल्या महीलेची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी आल्या होत्या, त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी हॉटेल चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
महाबळेश्वर हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असुन येथे मोठया प्रमाणावर पर्यटक सहलीसाठी येतात, यामध्ये गुन्हगारी प्रवृत्तीचे लोकही असतात. अशा लोकांची ओळख पटावी व त्यांना महाबळेश्वरसारख्या ठिकाणी लपून राहता येवु नये, याकरीता हॉटेलमध्ये खोली देण्यापुर्वी येथे आलेल्या प्रत्येकाचे ओळखपत्राची एक पत्र हॉटेलमध्ये घेण्यात यावी तसेच त्यांचा मोबाईल नंबर व त्यांच्या वाहनाचे नंबर अशी सर्व माहिती हॉटेल व्यावसायिकांनी जतन करून ठेवावी, असे आव्हान जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी गेल्या आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांच्या झालेल्या बैठकीत केले होते. काही बेकायदशीर हॉटेल व्यवसाय करणारे पर्यटकांची कोणतीच माहीती घेत नाहीत असे वारंवार निदर्शनास आले आहे. पर्यटकांसोबत लहान मुले असतील तरी त्यांचे ओळखपत्र घेतलेच पाहीजे असे स्पष्ट आदेश दिले होते. या बैठकीस आठ दिवसही उलटले नसताना, जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. लिंगमळा धबधब्यावरून आत्महत्या करणारे प्रेमीयुगल काही दिवसांपूर्वी छ. संभाजी महाराज वाहनतळा शेजारी असणाऱ्या हॉटेल रेसिडेन्सीमध्ये उतरले होते. हॉटेल व्यवसायिकाने दोघांपैकी केवळ पुरूषाचेच ओळखपत्र घेतले होते. तर महीलेचे ओळखपत्र घेतले नव्हते, त्यामुळे प्रेमी युगालापैकी महीलेची ओळख लवकर पटवण्यास पोलिसांना अडचणी आल्या होत्या. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी हॉटेल मालक सलिम मोहंमद अमिनकाजी रा. बांद्रा मुंबई व हॉटेलचा व्यवस्थापक फईज अहमद इक्बाल बढाणे रा.रांजणवाडी ता. महाबळेश्वर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |