01:30am | Jul 02, 2019 |
सातारा : कोरेगाव-रहिमतपूर रोडवर हॉटेल साईनाथ परिसरात गावठी बनावटीचा कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) रंगेहाथ पकडले. संशयित दोघे कोरेगाव व पाटण तालुक्यातील आहेत. दरम्यान, एलसीबी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये दोन जिवंत काडतुसे, दुचाकी असा 1 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नवनाथ हिंदुराव लोहार (वय 34, रा.कुमठे ता.कोरेगाव) व संदीप धनाची पाटसुते (वय 35, रा. मरळी ता.पाटण) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कोरेगाव रस्त्यावर गावठी बनावटी कट्ट्याची विक्री होणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. या कारवाईसाठी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. संशयित कोरेगाव-रहिमतपूर रस्त्यावरील हॉटेल साईनाथ येथे आल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला. एका दुचाकीवर संशयित दोघे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना हटकले. पोलिसांना पाहताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळून त्यांची अंगझडती घेतली असता एकाच्या कंबरेला गावठी कट्टा मिळाला. यावेळी संशयितांकडे दोन जिवंत काडतुसेही होती.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयितांना कोरेगाव पोलिस ठाण्यात वर्ग केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अटक केली. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसणे,पोलिस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, पोलिस हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कचरे, धिरज महाडीक, केतन शिंदे, वैभव सावंत, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन, गणेश कापरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |