01:12pm | Apr 15, 2024 |
सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आज दि. 15 रोजी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे मोठ्या शक्तीप्रदर्शनाने शरद पवारांच्या उपस्थितीतच भरणार आहेत. असे असताना अद्याप महायुतीमधील कोणत्याच घटक पक्षाने अद्याप सातारा लोकसभेसाठी उमेदवाराचे नावच जाहीर केले नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच ‘मी येतोय, तुमचा आशिर्वाद घ्यायला, हवी आहे तुमची साथ...’, असे मथळे असलेले शशिकांत शिंदेंचे सातारा शहरात बॅनर झळकल्याने महायुती मात्र गॅसवर असल्याचे चित्र दिसत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. गेली 23 वर्षे अभेद्य असलेला हा किल्ला कोसळतोय, की सावरतोय हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतीलच कद्दावर नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवारांसह डझनभर नेत्यांनी भाजपशी घरोबा करीत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शरद पवार एकटे पडले. परंतू असे असतानाही सातार्यातील कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, माजी पालकमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यासह जिल्ह्यातील जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार यांचा गट जिल्ह्यात जिवंत राहीला आहे. असे असतानाच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभेसाठीचा उमेदवार कोण? असा प्रश्न अनेकांना पडलेला होता. खुद्द शरद पवारच सातारा लोकसभा लढवणार, अशा चर्चाही झडलेल्या होत्या. परंतू, या सर्व चर्चांना बगल देत शरद पवारांनी आपला हुकूमी एक्का बाहेर काढत लोकसभा उमेदवारीची माळ आ. शशिकांत शिंदेंच्या गळ्यात घातली.
गेली 23 वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात असलेल्या शशिकांत शिंदेंनी मातब्बरांना पराभवाची धूळ चारुन त्यांना केळघरचा घाट दाखवण्याचे काम केले आहे. शशिकांत शिंदे प्रथमच लोकसभेसाठी उभे राहिलेले आहेत. असे असतानाच महायुतीकडून मात्र अद्याप उमेदवाराचे नावच न घोषित केल्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. सातारा लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट) ही आग्रही असल्याने भाजपसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) यांनी सातारा लोकसभा जिंकायचीच, असा निर्धार केलेला आहे. गेली 23 वर्षे बालेकिल्ला असलेला सातारा लोकसभा मतदारसंघ स्वत:कडे ठेवण्यासाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरले आहेत.
आज दि. 15 रोजी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने शरद पवारांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे सातारा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. तत्पूर्वीच शशिकांत शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराला सुरुवातही केली आहे. ‘मी येतोय, तुमचा आशिर्वाद घ्यायला, हवी आहे ती तुमची साथ...’ अशी टॅगलाईन असलेले शशिकांत शिंदेंचे फ्लेक्स सातार्यातील जागोजागी उभे करण्यात आले असून हे फ्लेक्स मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. एकूणच शशिकांत शिंदेंच्या उमेदवारी ‘टॅगलाईन’ने महायुती गॅसवर बसली आहे. उमेदवारच जाहीर न केल्याने महायुतीतून शशिकांत शिंदेंच्या विरोधात कोण? असा प्रश्न मात्र सामान्य मतदारांना पडलेला आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |