08:11pm | Apr 26, 2024 |
सातारा : स्थानिक गुन्हे शाखेने गेंडामाळ आकाशवाणी या ठिकाणी केलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये संशयित दोघांकडून देशी बनावटीची दोन पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, एक रिकामी मॅक्झिन व मोटरसायकल असा एक लाख 95 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ओमकार राजाराम काकडे वय 21 राहणार शिरटे तालुका वाळवा जिल्हा सांगली आणि गोरख सिताराम महाडिक वय 40 राहणार गोटेघर पोस्ट रांजणी तालुका जावळी या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लागू असलेल्या आदर्श आचारसंहिता संदर्भात अग्निशस्त्र संबंधित कडक कारवाया करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे 25 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता सातारा शहरातून कोंबिग ऑपरेशनं सुरू होते. सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाळणे, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, तानाजी माने हे पथक आकाशवाणी गेंडामाळ नाका येथे फिरत असताना शाहूपुरी ते आदर्श कॉलनी रस्त्यावर दोन इसम काळ्या रंगाच्या होंडा एक्टिवा गाडीवरून जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून एका इसमाची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीची दोन पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, एक रिकामे मॅगझिन आढळून आले. त्यामुळे हिरो मोपेडसह अन्य साहित्य असा एक लाख 95 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नोव्हेंबर 2022 पासून 82 देशी बनावटीची पिस्तुले, तीन बारा बोर रायफल, 194 जिवंत काडतुसे व 377 रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईत प्रवीण फडतरे, अमित झेंडे, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित सपकाळ, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, रोहित निकम, विशाल पवार, वैभव सावंत, सचिन ससाने, मयुर देशमुख, शिवाजी गुरव, विजय निकम यांनी सहभाग घेतला.
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |