बदायूं : उत्तर प्रदेशातील बदायूं येथून दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्याकांडानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळीही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दोन मुलांची हत्या करणाऱ्या आरोपी साजिदला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. यानंतर, पोलिसांनी लवकरात लवकर दुसरा आरोपी असलेल्य जावेदचेही एन्काउंटर करावे, तेव्हाच मला न्याय मिळेल, असे आपल्या काळजाचे तुकडे गमावलेल्या आईने म्हटले आहे.
साजिदने 11 आणि 9 वर्षांच्या चिमुकल्यांची निर्दयी हत्या केल्यानंतर परिसरात सन्नाटा पसरला आहे. काही माध्यमांतील वृत्तांनुसार, पीडित कुटुंबाने या संपूर्ण घटनाक्रमाला जादू-टोण्याशी जोडले आहे. एवढेच नाही, तर साजिदने हत्या करून मुलांचे रक्तही प्यायले. त्याच्या तोंडाला मांसाचे तुकडे लागलेले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. पोलीस या आरोपांचा तपास करत आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त आहे.
जन्माला येताच मरण पावली होती साजिदची 5 मुलं
या दुहेरी हत्याकांडामागे काही जादू-टोण्याचा प्रकार असू शकतो, अशी चर्चा परिसरात आहे. आरोपी साजिदने एकदा, आपली पाच मुले जन्माला येताच मरण पावली, एकही बचावले नाही, असे संगीताला सांगितले होते. आता पुन्हा जिल्हा महिला रुग्णालयात पत्नीची प्रसूती आहे. यासाठी त्याने संगीताकडून पाच हजार रुपयेही उसने घेतले होते. त्याने छतावर जाऊन मुलांची हत्या केली. महत्वाचे म्हणजे, या घटनेमागे जुने वैमनस्यही असू शकते, असे काही लोक म्हणत आहेत. मात्र या दुहेरी हत्येचे नेमके कारण काय? हे अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही.
अशी घडली संपूर्ण घटना, हत्येनंतर जावेद तेथेच उभा होता :
यासंदर्भात स्थानिकांनी केलेल्या दाव्यानुसार, दोन्ही मुलांच्या हत्येनंतर आरोपी जावेद तेथेच उभा होता. एका प्रत्यक्षदर्शीने म्हटले आहे की, मंडी समिती चौकीजवळ नवीन बाबा कॉलनी विकसित झाली आहे. या वसाहतीत पाण्याच्या टाक्या बांधणारे कंत्राटदार विनोद कुमार हे कुटुंबासह राहतात. त्यांना तीन मुले आहेत. त्याची पत्नी ब्युटी पार्लरचे काम करते. पत्नी संगीताने दिलेल्या माहितीनुसार, शेजारीच सलून चालवणारे आरोपी साजिद आणि जावेद त्यांच्या घरी आले. आरोपीने सर्वप्रथम संगीताकडून 45 रुपयांचे सामान खरेदी केले. यानंतर पत्नीच्या उपचारासाठी 5 हजार रुपये घेतले. यावेळी संगीताने आरोपी साजिदला चहा दिला, आरोपीने चहा घेण्यास सुरुवात केली. यावेळी दुसरा आरोपी जावेद बाहेर बसला होता. चहा घेत आरोपी साजिद घराच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचला आणि तिथेच त्याने विनोदच्या दोन्ही मुलांवर चाकू आणि वस्तऱ्याने हल्ला केला.
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |