03:35pm | Jul 21, 2023 |
कराड : सणबूर, तालुका पाटण येथील एका घरात आज चार मृतदेह आढळून आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. वृद्ध आई, वडील, मुलगा आणि विवाहित मुलीचा मृतांमध्ये समावेश आहे. हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या, याचा पाटण पोलीस कसून शोध घेत आहेत. या घटनेविषयी मात्र तर्कवितर्क लढवले जात असून पोलीस पथके तपासासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत.
याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील सणबूर येथे गावापासून काही अंतरावर रुवलेकडे जाणाऱ्या मार्गावर जाधव कुटुंब वास्तव्यास होते. आनंदा पांडुरंग जाधव काही दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर कराड येथे वैद्यकीय उपचार सुरू होते. दरम्यान उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. रात्री घरी त्यांच्यासह पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असे चौघेजण होते.
शुक्रवारी सकाळी त्यांचा घराचा दरवाजा उघडलेला नसल्याने व हाका मारूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईकांचा संशय बळावला. दरवाजा तोडल्यानंतर चौघेही अंथरुणात मृतावस्थेत पडलेले आढळून आले. ढेबेवाडी सह विविध ठिकाणाची पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली असून आत्महत्या की अन्यकाही याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. दुपारी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कराडला नेण्यात आले आहेत. त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |

कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |