सातारा : येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलातून सुटलेल्या दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या संघटनेमार्फत निमा मॅरेथॉन 2023 या स्पर्धेला सातारकरांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेसाठी 600 स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेला प्रमुख अतिथी सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक डॉ.संदीप काटे हस्ते या दोन्ही मॅरेथॉन स्पर्धेचा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर साताऱ्यातील पहिल्या महिला कॉम्रेड रनर डॉक्टर अश्विनी देव, तसेच जिल्हा विधी व न्याय अधिकारी राजेश पेनुरकर साहेब, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर साहेब हेही या स्पर्धेसाठी उपस्थित होते.
या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 10 किलोमीटर अंतरामध्ये डॉक्टरांच्या गटामध्ये 18 ते 30 वर्षे वयोगटात डॉ.जयंत भिंगारदिवे 31 ते 40 वयोगटात डॉ. अमोल पवार 41 ते 50 वयोगटात डॉ.दत्तात्रय तावरे 51 व त्या पुढील वयोगटात डॉ. विकास फरांदे हे विजेते ठरले महिलांच्या गटात 18 ते 30 वर्षे वयाच्या गटांमध्ये डॉक्टर स्नेहल शिवथरे 31 ते 40 वर्षे वयोगटात डॉ. गीता शिंदे 41 ते 50 वर्षे वयोगटात डॉक्टर आरती मावशी 51 व त्या पुढील वयोगटात डॉ.नीलिमा वनारसे या विजेत्या ठरल्या डॉक्टरांना व्यतिरिक्त सर्वसामान्य धावपटूंच्या गटामध्ये 18 ते 30 वर्षे वयोगटात शिवम कापले, 31 ते 40 वयोगटात योगेश जाधव, 41 ते 50 वर्षे वयोगटात विजय भिलारे, ५१ व त्यावरील वयोगटात विठ्ठल आरगडे हे विजेते ठरले.
तर महिलांच्या गटात 18 ते 30 वर्षे वयोगटात स्वाती साळुंखे 31 ते 40 वर्षे वयोगटात दिपाली कीर्तन 41 ते 50 वयोगटात स्मिता शिंदे 51 आणि त्यावरील वयोगटात शशिकांत घोरपडे हे विजेते ठरले. या सर्व विजेत्यांचा सत्कार प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत 80 वर्षाचे मनाने तरुण असणारे वयोवृद्धही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर सर्वांना संघटनेच्या वतीने सन्मानित चिन्हे प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, सचिव डॉ. विश्वजीत बाबर, खजिनदार डॉ.सुधाकर लाड यांचे सह उपाध्यक्ष डॉ.संजय नलावडे, सहाय्यक सचिव डॉ.पवन गायकवाड, डॉ.संकेत शिरसाट, सहाय्यक खजिनदार डॉ.संदीप कोरडे, संचालक डॉ. सुधाकर बेंद्रे, डॉ.माणिक जाधव, डॉ.मनीष कुमार जंगम, डॉ.मनोहर सासने, डॉ.अभिजीत पुजारी, डॉ.अभीराम पेंढारकर, डॉ. संजय यादव, डॉ.अभिजीत मायने, स्त्री संचालिका डॉ.मंजुषा पवार, डॉ.उर्मिला शिंगटे यांचे सह संचालक डॉ.महेश जाधव, डॉ.दीपक माने, डॉ.महेश पवार राज्यस्तरावरील प्रतिनिधी डॉ.सुजित बेंद्रे, डॉ.संदीप निकम, डॉ.ऋतुराज देशमुख, डॉ.आशिष जरग, डॉ.रविराज निकम संस्थापक संचालक डॉ.सुधाकर बेंद्रे व डॉ.माणिक जाधव यांचे सह या मॅरेथॉन स्पर्धेचे संचालक डॉ.सुधीर पवार व डॉ.शुभांगी गायकवाड यांचे सह प्रशिक्षक व मार्गदर्शक डॉ.दयानंद घाडगे, डॉ.सुनिता चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
या स्पर्धेसाठी सातारा मधील चंदुकाका सराफ, युनिक डायग्नोस्टिक, गौरीशंकर डायग्नोस्टिक, धन्वंतरी डायबिटीस सेंटर, संजीवनी आयसीयू, आधार हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, दिवेकर हॉस्पिटल, मंगलमूर्ती हॉस्पिटल, अजिंक्यतारा हॉस्पिटल, श्वास हॉस्पिटल, स्पंदन हॉस्पिटल, मोकाशी ऑर्थो हॉस्पिटल, डॉ.श्रीधर पवार, पीएनजी, मंगेश धबधबे, विन विन टेक्नॉलॉजी, शिवकृपा सहकारी पतसंस्था पिढी सातारा या सर्वांनी स्पॉन्सरशिप दिली होती.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |