सातारा : महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये बालगृहे कार्यरत असून या बालगृहात अनाथ, निराधार, उन्मार्गी, विधी संघर्षग्ररूस्त मुले/मुली दाखल आहेत. दाखल प्रवेशितांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील बालगृहात दाखल असलेल्या व इतर विद्यालयातील एकुण २०० प्रवेशितांच्या जिल्हास्तरावरील चाचा नेहरू बालमहोत्सवा अंतर्गतच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. हा बालमहोत्सव दि.30 जानेवारी ते 1 फेबुवारी या कालावधीत पोलीस कवायत मैदान, सातारा येथे संपन्न होणार असून जिल्हास्तरावरील चाचा नेहरू बालमहोत्सवाचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते दि. 30 जानेवारी करण्यात येणार आहे.
या क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, १०० मिटर धावणे, २०० मिटर धावणे, ४०० मिटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक, लिंबू चमचा, संगित खुर्ची, उंच उडी, लांब उडी, इत्यादी क्रिडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. बौध्दिक स्पर्धांमध्ये बुध्दीबळ, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, समूह गीते या स्पर्धा होणार आहेत. चाचा नेहरू बाल महोत्सवामध्ये विजेता ठरलेल्या विजयी व उपविजयी संघाना शिल्ड, ट्रॉफी, स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडल देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी बालकांना प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास शंभूराज शिवाजीराव देसाई, मंत्री, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, ठाणे व सातारा जिल्हा तसेच मा.जिल्हाधिकारी, सातारा पोलीस अधिक्षक, सातारा, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा व इतर मान्यवर उपस्थित राहून मुलां-मुलींना योग्य मार्गदर्शन करणार आहेत. दि. 1 फेबुवारी रोजी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने या बालमहोत्सवाचा समारोप होणार आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी दिली.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |