सातारा : प्रत्येक मागासवर्गीय व्यक्तीस शिक्षण, सेवा, निवडणूक व इतर संविधानिक लाभ आरक्षणाच्या माध्यमातून प्राप्त करून घेताना जाती प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. अनेकदा मागासवर्गीय व्यक्तीस पालकांमधील अज्ञान व योग्य मार्गदर्शनाचा अभाव इत्यादी कारणांमुळे विहीत कालावधीत जात प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना संविधानिक अधिकारापासून वंचित रहावे लागते असे निदर्शनास आले आहे.
महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन दि. १० एप्रिल ते दि. २५ एप्रिल २०२४ पर्यंत समता पंधरवडा घोषित करुन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा या कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा जाती पडताळणी समिती सदस्य, स्वाती इथापे यांनी दिली आहे.
समता पंधरवडा कार्यक्रमामध्ये इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान मध्ये शिकणा-या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी सातारा यांचेद्वारे पुढीलप्रमाणे विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
विशेष त्रुटीपूर्तता मोहिम- दि. १५ एप्रिल २०२४ रोजी शैक्षणिक विषयक, दि. १६ एप्रिल २०२४ रोजी इतर विषयक, दि. १८ एप्रिल २०२४ रोजी निवडणुक विषयक व दि. १९ एप्रिल २०२४ रोजी सेवा विषयक प्रकरणांचे त्रुटीपूर्तता मोहिमेचे आयोजन केले आहे.
तालुकास्तरीय अभिलेख पडताळणी शिबिर- दि. १५ ते १९ एप्रिल २०२४ या आठवड्यामध्ये कालावधीमध्ये समितीद्वारे जाती प्रमाणपत्र पडताळणी कामी तालुकास्तरीय शिबिरांमध्ये शालेय व महसुली पुराव्यांचे अभिलेख पडताळणी शिबीर आयोजित करणे.
मार्गदर्शनपर कार्यशाळा / बैठकांचे आयोजन: दि. १६ एप्रिल २०२४ रोजी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, समान संधी केंद्र समन्वयक, तालुका स्तरावरील समतादुत यांची ऑनलाईन कार्यशाळा / बैठक आयोजन करण्यात आलेले आहे. आ. दि. १५ ते १९ एप्रिल २०२४ या आठवड्यामध्ये तालुकास्तरावरती "सहज सुलभ जात पडताळणी शिबीर" आयोजित करण्यात येणार आहे. इ. तसेच या कालावधीमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक माध्यमिक) जिल्हा परिषद सातारा, सर्व गटशिक्षणाधिकारी पं.स. सातारा जिल्हा, तसेच सर्व तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या समन्वयाने सर्व जिल्हा परिषद शाळा व सर्व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेत जातो प्रमाणपत्र मिळण्यासाठी मार्गदर्शनपर बैठका / कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच चालु वर्षी १२ वी शास्त्र अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर सन २०२४-२५ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या ज्या मागासवगीय विद्यार्थ्यांनी समितीस जात पडताळणी साठी अर्ज केला आहे परंतु अदयाप वैधता प्रमाणपत्र मिळालले नाही, अथवा ज्या विद्यार्थ्यांचे प्रकरण त्रुटीयुक्त आहे अशा सर्व विद्याध्यांनी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा या कार्यालयात दि. १५ ते १९ एप्रिल २०२४ रोजी किंवा त्यापूवी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहुन श्रृटीपूर्तता करावी. असे आवाहन स्वाती इथापे, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांनी केले आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |