03:43pm | Dec 16, 2021 |
वाई : सहकार भारती या संघटनेच्या माध्यमांतून सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांची संघटना बळकट करावी. सहकार भारतीला अभिप्रेत असे आदर्शवत काम नवीन पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री संजय परमने यांनी केले.
सहकार भारतीच्या सातारा जिल्हा कार्यकारीणीची निवड वाई अर्बन को. ऑप. बँकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सातारा येथील धन्वंतरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोसले यांची सातारा जिल्हा अध्यक्ष व किसन वीर साखर कारखान्याचे संचालक प्रवीण जगताप (केंजळ) यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष डॉ. भोसले यांनी पुढील तीन वर्षांसाठी 42 जणांची नवीन जिल्हा कार्यकारीणी जाहीर केली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश साखर कारखाना प्रकोष्ट प्रमुख सीए. चंद्रकांत काळे यांनी सहकारी तत्वावर जिल्ह्यात हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प केला. कोल्हापूर विभाग सहप्रमुख नरेंद्र गांधी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सातारा जिल्हा प्रचार प्रमुख विनायक भिसे म्हणाले, सहकार भारतीमधील काम करणारे सर्वजण सहकाराची "शुद्धी- वृद्धी, समृद्धी" या त्रिसूत्रीवर आधारित कार्यरत आहेत. संघटनेमधील पद ही संघटना नीट चालण्याकरिता व्यवस्था आहे, "पद" ही शोभेची वस्तू नसते तर जबाबदारीची जाणीव करून देणारे "पद" असते, अर्थात यापलिकडे संघटना नीट चालते, ती संघटनेमधील कार्यकर्ता. या सर्व कार्यकर्त्यांमुळे आज सहकार भारती उभी आहे.
"उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको" या उक्तीप्रमाणे सर्वांनीकाम करावे, सर्वांना अभिमानच आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू स्थानी असलेले व सहकार भारतीचे संस्थापक प्रणेते वकिल लक्ष्मणराव इनामदार आपल्या जिल्ह्यातील खटाव या गावचे आहेत. त्यामुळे आपण वकिल इनामदार यांच्या मनातील सहकारामधील संस्कारित कार्यकर्ता निर्माण करून, तळागाळातील सर्वसामान्य माणूस सुखी, समाधानी, व्हायला पाहिजे, हे ध्येय सर्व कार्यकर्त्यांनी समोर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
महामंत्री आनंद शेलार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सहकार भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ फडके, प्रशिक्षण प्रमुख अविनाश जोशी, जिल्हा संघटक मिलिंद पुरोहित, सहसंघटक देवानंद शेलार, वाई अर्बन बँकेचे सीईओ श्रीपाद कुलकर्णी, सचिन गांधी, दीपक बावळेकर, डॉ. शेखर कांबळे, डॉ. साळुंखे, अँड. अमित देशमाने, नंदकुमार बागवडे, शैलेश ढवळीकर आदी उपस्थित होते.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दिवंगत सीडीएस प्रमुख जनरल बिपिन रावत व त्यांच्या सोबतचे दिवंगत अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |