04:06pm | Oct 04, 2023 |
नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ सुरु होण्यास फक्त २४ तासांचा कालावधी शिल्लक आहे. स्पर्धेतील पहिली मॅच उद्या ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर अंतिम लढत १९ नोव्हेंबर रोजी होईल. यजमान भारतीय संघाची पहिली लढत पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघाची वर्ल्डकपमधील कामगिरी अन्य कोणत्याही संघांपेक्षा सरस आहे. पण यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात अशा काही त्रूटी आहेत ज्याचा फटका त्यांना बसू शकतो. भारतीय संघ पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या या त्रूटींचा फायदा घेऊन विजय मिळवू शकतो. वर्ल्डकपच्या आधीच बुक्का पाडला! फक्त इतक्या चेंडूत केले शतक, विक्रमी खेळीनंतर वाट्याला आले मोठे दुःख ऑस्ट्रेलियाच्या संघातील सर्वात मोठी कमकूवत बाजू म्हणजे भारतासारख्या देशात जिथे फिरकी गोलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्टी आहेत तेथे ऑस्ट्रेलियाने एकच मुख्य फिरकीपटूचा समावेश केला आहे. अॅडम झप्पा वगळता ऑस्ट्रेलियाकडे अन्य मुख्य फिरकीपटू नाही. संघात एश्टन एगरचा समावेश करण्यात आला होता. मात्र दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला आणि त्याच्या जागी मार्नस लाबुशेनला संघात घेण्यात आले. ऑस्ट्रेलिया संघात ग्लेन मॅक्सवेल हा एक फिरकी गोलंदाज आहे. ज्याने भारताविरुद्धच्या अखेरच्या वनडेत ४० धावात ४ विकेट घेतल्या होत्या. या शिवाय लाबुशेन देखील फिरकी गोलंदाजी करू शकतो. पण हे दोघे मुख्य फिरकीपटू नाहीत. म्हणजे दोघेही सातत्याने विकेट मिळून देतील याची हमी नाही.
पाच वेळा विजेत्या ऑस्ट्रेलिया संघात एकापेक्षा एक जलद गोलंदाज आहेत. यात मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड आणि कर्णधार पॅट कमिन्सचा समावेश होते. पण स्टार्क आणि हेजलवुड यांच्या फिटनेसचा भरवसा नाही. स्वत: कर्णधार कमिन्स दुखापतीतून संघात परतला आहे. वर्कलोड आणि फिटनेस यामुळे स्टार्क आणि हेजलवुड वर्ल्डकपमधील सर्व सामने खेळतील याची शक्यता कमी वाटते. अशात ऑस्ट्रेलियाकडे बॅकअप जलद गोलंदाज कमी पडू शकतो. संघात कॅमरून ग्रीन आणि मार्कस स्टोयनिस देखील आहेत. मात्र भारतीय खेळपट्टीवर त्याचा किती प्रभाव पडेल याबाबत शंकाच आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेत सीन एबॉटची धुलाई झाली होती. मिचेल मार्शला भारताविरुद्धच्या मालिकेत गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. अशाच एखाद्या खेळाडूची दुखापत ऑस्ट्रेलियाचा मोठा धक्का देऊ शकते. अंतिम ११ मध्ये कोण असणार विकेटकीपर ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघात दोन विकेटकीपर आहेत. एलेक्स कॅरी आणि जोश इंग्लिश हे दोन विकेटकीपर आणि फलंदाज आहेत. आता अंतिम ११ मध्ये यापैकी कोणाला संधी मिळते हे पहावे लागले. या दोघांकपैकी कोणाची निवड करावी याची निवड करणे कर्णधारासाठी डोकेदुखी ठरू शकते.
कॅरीकडे ७१ वनडे सामन्याचा अनुभव आहे. त्याच्या नावावर १ हजार ८१४ धावा आहेत. गेल्या महिन्यात त्याने द.आफ्रिकेविरुद्ध ७७ चेंडूत ९९ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर तो काही फार धावा करू शकला नाही. भारताविरुद्धच्या मालिकेतील २ लढतीत तो १४ आणि ११ धावा करू शकला. दुसरा विकेटकीपर जोश इंग्लिशने ८ सामन्यात १४३ धावा केल्या आहेत. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया कसा संघ निवडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चेन्नईत ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड दमदार असले तरी वरील त्रूटी पाहता कर्णधार रोहित शर्मा याचा फायदा घेण्याची संधी सोडणार नाही.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |