मुंबई : शंभरावी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने ( R ASHWIN ) ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्या डावात ४ विकेट्स घेणाऱ्या भारतीय फिरकीपटूने दुसऱ्या डावात ५ बळी टिपले. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने ३६ वेळा डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि अनिल कुंबळेचा ( ३५) विक्रम मोडला. याशिवाय त्याने मोठा पराक्रम केला, जो महान फिरकीपटू शेन वॉर्न व मुथय्या मुरलीधरन यांनाही नाही करता आला.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करून २५९ धावांची आघाडी घेतली. कर्णधार रोहित शर्मा पाठीत उसण भरल्याने मैदानावर आला नाही. जसप्रीत बुमराह नेतृत्व करताना दिसला. आर अश्विनने त्याच्या पहिल्या ४.२ षटकांत बेन डकेट, झॅक क्रॉली व ऑली पोप यांना माघारी पाठवून इंग्लंडची अवस्था ३ बाद ३६ अशी केली. जॉनी बेअरस्टो व जो रूट यांनी ५० चेंडूंत ५६ धावा जोडल्या. कुलदीप यादवने पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू टाकून इंग्लंडला धक्का दिला. ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३९ धावा करणारा बेअरस्टो पायचीत झाला. इंग्लंडने ४ बाद १०० धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या कर्णधार बेन स्टोक्सला बाद करण्यासाठी अश्विनला पुन्हा गोलंदाजीला आणले गेले आणि त्याने कमाल केली. बेन स्टोक्स ( २) त्रिफळाचीत करून अश्विनने डावातील चौथी विकेट घेतली. इंग्लंडचा निम्मा संघ १०३ धावांवर माघारी परतला आणि ते अजून १५६ धावांनी पिछाडीवर आहेत. अश्विनने १३ वेळा स्टोक्सची विकेट घेऊन विक्रम नोंदवला. कसोटीत एकाच फलंदाजाला भारतीय गोलंदाजाने बाद केल्याची ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. कपिल देव यांनी मुदस्सर नाझरला १२ वेळा बाद केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्विनने १७ वेळा स्टोक्सला बाद करून कपिल देव यांचा ( १६ वि. डेसमंड हायनेस) विक्रम मोडला.
लंच ब्रेकनंतर अश्विनने आणखी एक धक्का देताना बेन फोक्सचा ( ८) त्रिफळा उडवून डावातील पाचवी विकेट घेतली. १००व्या कसोटीत डावात ५ विकेट्स घेणारा तो जगातील चौथा गोलंदाज ठरला. वॉर्नर, मुरलीधरन व कुंबळे यांनी असा पराक्रम केला होता. पण, १००व्या कसोटीत दोन्ही डावांत ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला. वॉर्नने पहिल्या डावात २ आणि मुरलीधरनने ३ विकेट्स घेतल्या होत्या. या दोघांनी त्यांच्या १००व्या कसोटीच्या दुसऱ्या डावात प्रत्येकी ६ विकेट्स घेतलेल्या.
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |