सातारा : पाटण शहरापासून काही अंतरावर असलेल्या सडावाघापूर घाटात गुजरवाडी गावाजवळील टेबल लँड परिसरात कार ३०० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास झाला. या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला. शहाजी व्यंकट भिसे (वय ४५, रा. नवारस्ता, ता. पाटण) असे अपघातात जखमी झालेल्या वीजवितरण कंपनीच्या कर्मचार्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास शहाजी भिसे हे कामानिमित्त सडा वाघापूरच्या दिशेने (एमएच ५० ए २१७३) ही कार स्वत: चालवत असताना अचानक त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार बाजूला असलेल्या दरीत खोलवर जवळपास ३०० फूट खाली कोसळली. यात शहाजी भिसे हे जखमी झाले तर पलट्या खात गाडी खोल दरीत पडल्याने वाहनाचा चक्काचूर झाला आहे.
या घटनेची माहिती मिळतात तत्काळ स्थानिक नागरिक व पाटण घटनास्थळी पोहोचले. पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने शहाजी भिसे यांना दरीतून बाहेर काढून तत्काळ रुग्णवाहिकेतून कराड येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यामध्ये गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |