08:32pm | Apr 14, 2024 |
सातारा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी वाई येथील अभियंता डॉ. राजेंद्र रामचंद्र रसाळ यांना पीएचडी (डॉक्टरेट) मिळाल्याबद्दल सातार्यात विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले, तर उपेक्षितांना शिक्षणाचा मूलमंत्र दिला. शिक्षण हे त्या वाघीणीचे दूध आहे, की जे पिल्यावर शिक्षित व्यक्ती अन्यायाविरोधात गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी समाजाला सांगितले. त्यांच्याच दिलेल्या मूलमंत्रावर डॉ. राजेंद्र रामचंद्र रसाळ वाटचाल करीत आहेत. डॉ. राजेंद्र रसाळ यांनी अतिशय खडतर परिश्रमातून आपले शिक्षण पूर्ण केले. काहीवेळेस तर दिव्याच्या उजेडात त्यांनी अभ्यास केला. ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांना आपला आदर्श मानतात.
वाई येथील अभियंता डॉ. राजेंद्र रामचंद्र रसाळ यांना गोवा येथे इस्टोनिया देशाच्या युरो एशियन विद्यापीठाच्या वतीने इंजीनिअरिंग सर्व्हिसेस या विषयावर पीएचडी प्रदान करण्यात आली. गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
त्याबद्दल आज रविवारी 14 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राजेंद्र रसाळ यांनी सातारा आणि सांगली या ठिकाणी धरणाच्या जिल्ह्यात वेगवेगळ्या उपसा सिंचन योजना राबविण्यात मोलाची मदत केली आहे. पाटबंधारे विभागात सेवा बजावत असताना त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग इतरांसाठी करता यावा या हेतूने इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या विषयावर प्रबंध तयार केला. त्यांनी तो प्रबंध इंस्टॉलिया या देशातील युरो एशियन विद्यापीठाकडे सादर केला. त्या विद्यापीठाने त्यांना दिनांक 6 एप्रिल रोजी दीक्षांत समारंभात कोलवा गोवा येथे गोव्याची माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते व जगातील सहा. व्हाईस चान्सलर यांच्या उपस्थितीत डॉक्टरेट प्रदान करुन सन्मानित केले.
याबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना डॉ. राजेंद्र रसाळ म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा माझ्यावर लहानपणापासूनच प्रभाव राहिला आहे. त्यापासून प्रेरणा घेवूनच मी पीएचडी ही पदवी मिळवू शकलो. ज्याप्रमाणे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांचा अभ्यास करुन पदव्या मिळवल्या त्याप्रमाणेच मीही विविध पदव्या संपादन करेन. मला मिळालेली पीएचडी ही पदवी मी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पित करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |